शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

२४ कारखान्यांची धुराडी पेटली

By admin | Updated: November 5, 2014 04:23 IST

राज्यात सोलापूर व अहमदनगर विभागातील २४ साखर कारखान्यांची धुराडी पेटली आहेत. या कारखान्यांच्या गळीत हंगामाने गती घेतली नसली तरी आतापर्यंत १५ लाख टन उसाचे गाळप

कोल्हापूर : राज्यात सोलापूर व अहमदनगर विभागातील २४ साखर कारखान्यांची धुराडी पेटली आहेत. या कारखान्यांच्या गळीत हंगामाने गती घेतली नसली तरी आतापर्यंत १५ लाख टन उसाचे गाळप झालेले आहे. कोल्हापूर विभागातील कारखाने गळीत हंगामासाठी सज्ज असले तरी ऊस दराची कोंडी अजून फुटली नसल्याने यांची धुराडी अद्याप थंडच आहेत. साधारणत: १० नोव्हेंबरनंतर येथील बहुतांशी कारखान्यांचा हंगाम गती घेण्याची शक्यता असून, कागल तालुक्यातील शाहू सहकारी कारखाना ७ नोव्हेंबर रोजी गाळप सुरू केले जाणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस परिषदेत २७०० रुपये पहिल्या उचलीची मागणी केली आहे. साखर कारखान्यांचा उतारा व त्यानुसार शेतकऱ्यांना द्यावी लागणारी एफआरपीची रक्कम पाहिली तर या मागणीच्या जवळपासच आहे. सध्या बाजारपेठेतील साखरेचे दर व राज्य सहकारी बँकेने कारखान्यांना देऊ केलेली उचल पाहता एकरकमी एफआरपी देताना कारखानदारांची दमछाक होणार आहे. दरवर्षी ऊस परिषदेनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना ऊसदराचे आंदोलनाचे रणशिंग फुंकते पण यावर्षी तात्पुरते का असेना आंदोलनाचे हत्यार म्यान करून चर्चेसाठी वेळ दिलेली आहे. पण हे करत असताना त्यांनी कारखाने सुरू करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे कारखानदारांसमोर पेच निर्माण झाला आहे.राज्य व केंद्र सरकारने कारखान्यांना मदतीबाबत तोंडही उघडलेले नाही. अशा परिस्थितीत कारखाने सुरू केले आणि एफआरपीप्रमाणे दर दिला नाही तर कायदेशीर कचाट्यात अडकण्याची भीती कारखानदारांना आहे. त्यामुळे विशेषत: कोल्हापूर विभागातील कारखानदारांनी ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ अशी भूमिका घेतली आहे. (प्रतिनिधी)