शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

जिल्ह्यातील २३ लहान धरणे ओव्हरफ्लो

By admin | Updated: September 24, 2016 02:40 IST

रायगड जिल्ह्यात गेल्या २४ तासांत एक हजार ६८९ मिलीमीटर पाऊस पडल्याने २८ पैकी २३ लहान धरणे पुन्हा एकदा ओव्हरफ्लो झाली आहेत

अलिबाग : रायगड जिल्ह्यात गेल्या २४ तासांत एक हजार ६८९ मिलीमीटर पाऊस पडल्याने २८ पैकी २३ लहान धरणे पुन्हा एकदा ओव्हरफ्लो झाली आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा दोनने जास्त आहे. धरणांमध्ये एकूण क्षमतेच्या ९५ टक्के पाणीसाठा निर्माण झाला आहे. त्यामुळे या धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग होत आहे.परतीच्या पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. पावसाचा जोर कायम असल्याने अंबा नदीने नागोठणे के.टी. बंधाऱ्याजवळ पूर पातळी ओलांडली आहे. गेल्या चोवीस तासामध्ये म्हसळात सर्वाधिक २४४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. रोहे २११ मिमी, माथेरान १९० मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. अलिबाग ८७ मिमी, पेण १८० मिमी, मुरुड ८८ मिमी, पनवेल २५ मिमी, उरण ४३ मिमी, कर्जत ४५ मिमी, खालापूर ४५, माणगाव ९८ मिमी, सुधागड ४३ मिमी, तळा २८९ मिमी, महाड ६९ मिमी, पोलादपूर ५८ मिमी, श्रीवर्धन ९० मिमी पाऊस पडला आहे. >भरलेली धरणेपेण तालुक्यातील आंबेघर धरण हे २५ टक्क्यांपेक्षा कमी भरले आहे. ७५ टक्क्यापेक्षा जास्त अलिबाग तालुक्यातील श्रीगाव, श्रीवर्धन तालुक्यातील कार्ले आणि रानवील, उरण तालुक्यातील पुनाडे ही चार धरणे भरली आहेत. मुरुड- फणसाड, तळा- वावा, रोहे- सुतारवाडी, सुधागड- कोंडगाव, घोटवडे, ढोकशेत, कवेळे, उन्हेरे, श्रीवर्धन- कुडकी, म्हसळा- पाभरे, संदेरी, महाड- वरंध, खिंडवाडी, कोथुर्डे, खैरे, कर्जत- साळोख, अवसारे, खालापूर- भिलवले, कोलोते-मोकाशी, डोणवत, पनवेल- मोरबे, बामणोली, उसरण ही धरणे पूर्ण क्षमतेने भरुन वाहत आहेत.>४८ तासांत म्हसळ्यात सर्वाधिक पाऊसम्हसळा : गेल्या आठवड्यातील सततच्या मुसळधार पावसाने म्हसळा तालुक्यात ठिकठिकाणी दरडी कोसळण्याचे प्रकार घडले मात्र सुदैवाने कोठेही जीवितहानी झाली नाही. गेल्या ४८ तासांत सर्वाधिक २१४ मिमी पाऊस म्हसळा तालुक्यात पडला आहे. येत्या ४८ तासांत मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. गुरु वारी व शुक्र वारी म्हसळ्यात पडलेल्या अतिवृष्टीने म्हसळा-गोरेगांव रस्त्यावरील वरच्या चिखलप व म्हसळा दुर्गवाडीदरम्यान दरड कोसळून काही तास वाहतूक बंद होती. बांधकाम खाते व नगरपंचायत यांनी जेसीबीच्या मदतीने मातीचे ढिगारे बाजूला केल्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरु झाली. नगराध्यक्ष दिलीप कांबळे आदी यावेळी उपस्थित होते.यंदा शेतीचे पीक अतिशय चांगले आल्यामुळे शेतकरी सुखावला असताना गेल्या आठवड्यापासून पावसाने थैमान घातले आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. बहुतेक शेती पूर्णपणे पसाळी असून लोंबीत दाणा तयार होत असताना एवढ्या पावसाची आवश्यकता नसते यामुळे पीक जाण्याची शक्यता असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. भाताच्या लोंबीत दाणा तयार होण्यासाठी ऊन्ह आणि अधूनमधून पावसाच्या हलक्या सरींची आवश्यकता असते मात्र काही दिवस असाच पाऊस सुरु राहिल्यास नुकसान होण्याची शक्यता आहे.