शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यातील २२४ जणांना डेंग्यू!

By admin | Updated: September 19, 2016 05:14 IST

महापालिका, नगरपालिकांमध्ये या पावसाळ्यात २२४ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे उघड झाले

सुरेश लोखंडे,

ठाणे- जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिकांमध्ये या पावसाळ्यात २२४ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे उघड झाले असून, १३ संशयित रुग्णांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनात आले आहे. डेंग्यूबाबतची जनजागृती मात्र नागरिकांचे जीव जात असतानाही अद्याप कागदावरच आहे. ऐन पावसाळ्यात मलेरिया (हिवताप), डेंग्यू आणि चिकणगुन्या आजाराने जिल्ह्यात ८५४ जण त्रस्त आहेत. यामध्ये सर्वाधिक डेंग्यूचे रुग्ण महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रात असल्याचे आॅगस्टमध्ये सर्वाधिक उघडकीस आले. दगावलेल्यांमध्येदेखील डेंग्यू संशयित रुग्णांचा अधिक समावेश आहे. दगावलेल्या १३ संशयितांपैकी केवळ दोन डेंग्यूचे रुग्ण असल्याचा शोध आरोग्य यंत्रणेला घेता आला. या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी डासांचा शोध घेणे तर सोडाच जनजागृतीदेखील अद्याप झाली नसल्याची चर्चा जिल्ह्यात ऐकायला मिळत आहे. डेंग्यूच्या चक्रव्यूहात ठाणे महापालिकेच्या मुंब्रा-कौसा, शिळफाटा परिसरातील २७ रुग्ण आहेत. यातील दोघांचा मृत्यू झाला आहे. कल्याण-डोंबिवलीतील ठाकूरवाडी, उमेशनगर, मंजूनाथनगर, तीसगांव, कोपररोड, शास्त्रीनगर, गांवदेवी या लोकवस्तीमध्ये ४१ रुग्ण आढलेले आहेत. यापैकी पाच जणांचा मृत्यू झाला असून, दोन डेंग्यूचे असल्याचे उघड झाले आहेत. ठाकूरवाडी परिसरातील लोकवस्तीत तर डेेंग्यूचे संशयीत रुग्ण आढळून आल्याचे निदर्शनात आले आहे. मलेरियाचादेखील एक रुग्ण नुकताच मोहने येथे दगावला आहे. अंबरनाथ नगरपालिकेच्या लक्ष्मीनगर, खदान रोड भागात २६ रुग्ण आढळले, त्यातील एकाचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील डेंग्यूसदृष्य रुग्ण महिनाभराच्या कालावधीपासून मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे डेंग्यू, मलेरियाकडे गांभीर्याने पहाण्याची गरज असल्याची वैद्यकीय क्षेत्रात ऐकायला मिळत आहे. मीरा-भार्इंदरच्या नवघर आणि मीरा रोड परिसरात २३ रुग्ण सापडलेले आहेत. यात एकाचा मृत्यू झाला. भिवंडी परिसरातील वालशिंद भागात ११ जण सापडले असता त्यातील एकाचा मृत्यू झाला. मलेरियाने आझादनगरमधील एकाचे निधन झाले आहे. शहापूर तालुक्यातील खर्डी, डोंळखांबमध्ये १०१ संशयीत रुग्ण आढळले. मलेरियाने सापगांवात एकाचा मृत्यू झाला.