शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवासाठी २,२१६ जादा बस; एसटी महामंडळाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 02:37 IST

कोकण मार्गावरील गणेशोत्सव काळातील गर्दी लक्षात घेता प्रवाशांच्या सेवेसाठी एसटीने २ हजार २१६ जादा बस चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोकण मार्गावरील गणेशोत्सव काळातील गर्दी लक्षात घेता प्रवाशांच्या सेवेसाठी एसटीने २ हजार २१६ जादा बस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. गतवर्षी २०१० जादा बस सोडल्या होत्या. यंदा त्यात २०६ गाड्यांची वाढ करण्यात आली आहे. दीड महिन्यावर आलेल्या गौरी-गणपती सणासाठी भाविकांची जय्यत तयारी सुरू झालेली आहे. परिणामी, रेल्वेच्या गणपती विशेष फेऱ्यांचे आरक्षणदेखील फुल्ल झाले आहे. यामुळे एसटी प्रशासनाच्या जादा गाड्यांमुळे प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्याची चिन्हे आहेत. दरवर्षीपेक्षा यंदा एसटी प्रशासनाने २०६ जादा गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. संगणकीय आरक्षणातून या जादा बसचे आरक्षण महिनाभर आधी म्हणजे २२ जुलैपासून प्रवाशांना करता येणार आहे. दरम्यान, जादा बसची गु्रप बुकिंग सुरू झालेली आहे. परतीच्या प्रवासाची आरक्षण प्रक्रिया २३ जुलैपासून सुरू होणार आहे.पावसाळ्यात कोकणातील प्रवास सुखकर होण्यासाठी महामार्गावरील मोक्याच्या ठिकाणी वाहन दुरुस्ती पथकांची (ब्रेक डाऊन व्हॅन) नेमणूक करण्यात येणार आहे. २० ते २४ आॅगस्टदरम्यान गणेशोत्सव विशेष गाड्या टप्प्याटप्प्याने चालवण्यात येणार आहेत. गाड्यांच्या नियोजनासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर प्रवाशांच्या सोईसाठी एसटीच्या वतीने तात्पुरत्या स्वरूपाची शौचालये उभारण्याचे आदेश संबंधिताना देण्यात आले आहेत.प्रवाशांसाठी टोल फ्री नंबर गणेशोत्सव काळात जादा फेऱ्यांची माहिती, आरक्षण प्रक्रिया वा अन्य माहितीसाठी प्रशासनाने १८००-२२-१२५० हा टोल फ्री क्रमांक सुरू केला आहे. तसेच प्रवाशांनी माहितीसाठी जवळच्या आगारात संपर्क साधावा, असे आवाहन एसटी प्रशासनाने केले आहे.