शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

२२ तालुके नक्षलमुक्त

By admin | Updated: December 28, 2014 00:41 IST

राज्यातील नक्षलग्रस्त क्षेत्रातून २२ तालुके वगळण्यात आले असून तेथे नक्षलवाद्यांच्या कोणत्याही कारवाया अस्तित्वात नसल्याचे शिक्कामोर्तब खुद्द पोलीस महासंचालकांनीच केले आहे.

पोलीस महासंचालकांकडून फेरआढावा : हजारो कर्मचाऱ्यांना आर्थिक ‘धक्का’ राजेश निस्ताने - यवतमाळ राज्यातील नक्षलग्रस्त क्षेत्रातून २२ तालुके वगळण्यात आले असून तेथे नक्षलवाद्यांच्या कोणत्याही कारवाया अस्तित्वात नसल्याचे शिक्कामोर्तब खुद्द पोलीस महासंचालकांनीच केले आहे. शासनाच्या ७ डिसेंबर २००४ च्या निर्णयानुसार संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यासह गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, नांदेड, यवतमाळ या जिल्ह्यातील एकूण ३७ तालुके नक्षलप्रभावित म्हणून घोषित करण्यात आले होते. त्यापोटी या नक्षल क्षेत्रात सेवा देणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना दरमहा १ हजार ५०० रुपये प्रोत्साहनपर भत्ता आणि एकस्तर वेतनश्रेणी दिली जात होती. सुमारे १० वर्षांपासून सहा जिल्ह्यातील हजारो शासकीय अधिकारी आणि कर्मचारी या भत्त्यांचा लाभ घेत आहेत. जानेवारी २०१४ मध्ये राज्याच्या पोलीस महासंचालकांकडून नक्षलग्रस्त क्षेत्राचा फेरआढावा घेण्यात आला. तेव्हा ३७ पैकी तब्बल २२ तालुक्यांमध्ये नक्षलवाद्यांच्या कोणत्याही उघड अथवा छुप्या कारवाया नसल्याचे पोलिसांना आढळून आले. तसा अहवाल १७ आॅक्टोबर २०१४ रोजी महासंचालकांनी शासनाला सादर केला. त्यानुसार शासनाने २२ तालुक्यांना नक्षलग्रस्त क्षेत्रातून वगळले आहे. त्यासंबंधीचा आदेश गृहविभागाचे उपसचिव ब.दि. उमाटे यांच्या स्वाक्षरीने २६ डिसेंबर २०१४ रोजी जारी करण्यात आला. २२ तालुके वगळल्याने तेथील हजारो शासकीय कर्मचाऱ्यांना आर्थिक धक्का बसला आहे. यापुढे त्यांना एकस्तर वेतनश्रेणी आणि दरमहा दीड हजार रुपयांच्या भत्त्याला मुकावे लागणार आहे. कोणत्याही नक्षली हालचाली नसताना उपरोक्त २२ तालुक्यांना तो दर्जा आणि आर्थिक लाभ कशासाठी, असा प्रश्न गेल्या कित्येक वर्षांपासून उपस्थित केला जात होता. हा नक्षल भत्ता म्हणजे शासकीय तिजोरीवर विनाकारण बोजा असल्याची ओरड केली जात होती. फेरआढाव्यात महासंचालकांनीही त्यावर शिक्कामोर्तब केल्याने शासनाच्या तिजोरीवरील कोट्यवधीचा बोजा आता वाचणार आहे. फेरआढावा २०१६ मध्येपोलीस महासंचालकांच्या अहवालावर २२ तालुके वगळण्याची कार्यवाही शासनाने केली. ही स्थिती पुढील दोन वर्ष कायम राहणार आहे. कारण नक्षल प्रभावित क्षेत्राचा पुढील आढावा थेट जानेवारी २०१६ मध्ये पोलीस महासंचालकांमार्फत घेतला जाणार आहे.