शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

नव्या सभागृहात २२ आमदारांची ‘पाटीलकी’

By admin | Updated: October 23, 2014 00:07 IST

सभागृहात पाटील, चव्हाण, देशमुख, नाईक या आडनावांच्या आमदारांचे वर्चस्व

वीरकुमार पाटील - कोल्हापूर --राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर अस्तित्वात येणाऱ्या सभागृहात पाटील, चव्हाण, देशमुख, नाईक या आडनावांच्या आमदारांचे वर्चस्व राहणार आहे. या आडनावांच्या निवडून आलेल्या उमेदवारांची संख्या अधिक आहे. यात विधानसभेत ‘पाटीलकी’ करणारे सर्वाधिक २२ आमदार आहेत.  महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसह जवळपास सर्वच निवडणुकांचे गणित हे जातिपातीच्या राजकारणावर अवलंबून राहिले आहे. त्यामुळे अमूक आडनावाचा किंवा जातीचा उमेदवार दिला, तर विशिष्ट जातीची मते मिळतील, असा अंदाज बांधला जातो. बहुतेकवेळा त्यामध्ये यशही येते. त्याशिवाय काही ठराविक आडनावांची लोकसंख्या राज्यात अधिक आहे. ही आडनावे विशिष्ट कामावरून, समाजाने दिलेल्या जबाबदारीवरून, राजेरजवाड्यांच्या काळात मिळालेल्या मानसन्मानावरून पडली आहेत. असे एकाच आडनावाचे उमेदवार अधिक संख्येने विधानसभेत निवडून जातात. यंदाही हा सिलसिला कायम राहिला असून, पाटील या आडनावाचे तब्बल २२ आमदार यंदा विधानसभेत आपल्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. २00९ मध्ये अस्तित्वात आलेल्या सभागृहात पाटील आडनावाचे २३ आमदार होते. यावेळी त्यामध्ये एकाने घट झाली आहे.  चव्हाण, देशमुख आडनावांचे प्रत्येकी आठ आमदार नूतन सभागृहात विराजमान होणार आहेत.मावळत्या सभागृहात चव्हाण आडनावाचे पाच, तर चार देशमुख आमदार होते. त्याखालोखाल नाईक आडनावाचे सातर् $िआमदार आहेत. त्याशिवाय ठाकूर, शिंदे, कदम या आडनावांचे प्रत्येकी पाच, तर चार जगताप आडनावाचे आमदार आहेत.  पवार आडनावामध्ये बारामतीतून राष्ट्रवादीचे अजित पवार, कल्याण (पू.) मधून भाजपचे नरेंद्र पवार, गेवराईमधून भाजपचे लक्ष्मण पवार या तिघांचा समावेश आहे, तर कांबळे आडनावाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या तिघांमध्ये देवळीचे काँग्रेसचे रणजित कांबळे, श्रीरामपूरमधील  काँग्रेसचे भाऊसाहेब कांबळे, पुणे कँटोन्मेंटचे दिलीप कांबळे यांचा समावेश आहे. मराठा समाजात पाटील जास्तपाटील हे आडनाव मराठा समाजात अधिक प्रमाणात असले, तरी ते बहुतेक जातींमध्ये आहे. कारण पूर्वी गावचा कारभार जो पाहत असे, त्याला पाटील म्हणत असत. साऱ्याच जातीतील घराण्यांकडे गावची पाटीलकी होती. त्याशिवाय लढाईवेळी किंवा चांगले काम केल्याची बक्षिसी म्हणून राजाकडून काही गावांची सत्ता दिली जायची. ज्याला असे बक्षीस मिळायचे, तो त्या गावांचा देशमुख म्हणून ओळखला जायचा.आडनाव ---आमदार ---पाटील २२ --चव्हाण८ --देशमुख ८ --नाईक७ --ठाकूर ५ --शिंदे५ --कदम५ --जगताप४ -पवार३ -कांबळे३