शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
4
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
5
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
6
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
7
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
8
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
9
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
10
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
11
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
12
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
13
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
14
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
15
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
16
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
17
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
18
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
19
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
20
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण

जमीन व्यवहारात २२ लाखांची फसवणूक

By admin | Updated: July 2, 2016 01:53 IST

पाटस (ता. दौंड) येथे व्यवसायासाठी जमीन देतो, असे सांगून २२ लाख रुपयांची फसवणूक केली असल्याची तक्रार बालाजी गावले यांनी दौंड पोलिसांना दिली.

दौंड : पाटस (ता. दौंड) येथे व्यवसायासाठी जमीन देतो, असे सांगून २२ लाख रुपयांची फसवणूक केली असल्याची तक्रार बालाजी गावले यांनी दौंड पोलिसांना दिली. दरम्यान, या प्रकरणी सुनील साळुंखे, शहाजी चव्हाण (दोघेही रा. पाटस, ता. दौंड) यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती ठाणे अंमलदार कल्याण शिंगाडे यांनी दिली. दौंड येथे माझा फॅब्रिकेशन आणि वेल्डिंगचा व्यवसाय आहे. तेव्हा आम्हाला व्यवसायासाठी जागा पाहिजे होती. त्यानुसार माझ्या ओळखीचे शहाजी चव्हाण यांच्याकडे जमिनीबाबत विचारणा केली असता ते म्हणाले. पाटस येथील सुनील साळुंखे यांच्या मालकीची जागा असून त्यांनी पाच गुंठे जागा विक्रीस काढली आहे. त्यानुसार जागा घेण्याचे ठरले. २९ लाख रुपयांच्या व्यवहारापोटी आम्ही २२ लाख रुपये सुनील साळुंखे यांना दिले व उर्वरित रक्कम खरेदीच्या वेळेला देतो, असा व्यवहार २०१५ मध्ये झाला. त्यानंतर वेळोवेळी जमीन खरेदीबाबत साळुंखे यांना विचारणा केली असता. महिन्यात करतो, दोन महिन्यात करतो, असे उडवाउडवीची उत्तरे मिळू लागली. आमची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांकडे फिर्याद नोंदवली असल्याचे बालाजी गावले यांनी फिर्यादीत म्हटले आहे. (वार्ताहर)