शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

२२ शेळ्या फस्त केल्या तरी भरपाई नाही

By admin | Updated: December 26, 2015 00:37 IST

सिद्धगडाच्या पायथ्याशी असलेल्या धापडपाडा या आदिवासी वस्तीमध्ये गेल्या आठवड्यात बिबट्याने विठ्ठल शंकर येंदे यांच्या २२ शेळ्या फस्त केल्या. त्यांच्या आणखी तीन शेळ्या बेपत्ता आहेत.

धसई : सिद्धगडाच्या पायथ्याशी असलेल्या धापडपाडा या आदिवासी वस्तीमध्ये गेल्या आठवड्यात बिबट्याने विठ्ठल शंकर येंदे यांच्या २२ शेळ्या फस्त केल्या. त्यांच्या आणखी तीन शेळ्या बेपत्ता आहेत. भीमाशंकर अभयारण्याच्या कर्मचाऱ्यांनी येंदे यांची भेट घेऊन पाहणी केली व या वृत्ताला दुजोरा दिला. मात्र हे आदिवासी अभयारण्याच्या क्षेत्रात राहत असल्याने नुकसानभरपाई देता येणार नाही, असा पवित्रा घेतला आहे.अभयारण्याच्या अधिकाऱ्यांकडे आदिवासींनी नुकसानभरपाईची मागणी केली असता धापडपाडा अभयारण्याच्या राखीव क्षेत्रामध्ये येत असल्यामुळे तेथे शेळ्या, गुरे चारण्यास बंदी असल्याचे सांगत नुकसानभरपाई मिळणार नसल्याचे स्पष्ट केले. याबाबत भीमाशंकर अभयारण्याचे वन परिक्षेत्र अधिकारी एम. डब्लू. बडवाईक यांच्याशी संपर्क साधला असता आम्ही ही घटना पुणे येथील मुख्यालयास कळविली आहे. नुकसानभरपाईचा निर्णय वरिष्ठ पातळीवरून घेण्यात येईल, असे स्पष्ट केले. भीमाशंकर अभयारण्यामध्ये अद्याप बोरवाडी, सिद्धगड, धापडपाडा आदी गावे राखीव क्षेत्रामध्येच वसलेली आहेत. ही गावे भीमाशंकर अभयारण्याची हद्द घोषित होण्यापूर्वीच वसलेली आहेत. त्यामुळे त्यांचे पुनर्वसन वन्य जीव अभयारण्य विभागामार्फत होणे गरजेचे आहे. गेल्या काही वर्षांपासून हे प्रस्ताव या टेबलावरून त्या टेबलावर फिरत असल्यामुळे पुनर्वसनाचे काम प्रलंबित आहे. परिणामी, या ग्रामस्थांना नाइलाजास्तव आपल्या मूळ परिसरातच राहावे लागत आहे. (प्रतिनिधी)