शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

टँकरवर २१२ कोटींचा खर्च !

By admin | Updated: July 19, 2016 04:47 IST

यंदा उन्हाळ्यात राज्यातील नागरिकांना पेयजल पुरविण्यासाठी तब्बल २१२ कोटी रुपये खर्च करावे लागले आहेत.

प्रदीप भाकरे,

अमरावती- यंदा उन्हाळ्यात राज्यातील नागरिकांना पेयजल पुरविण्यासाठी तब्बल २१२ कोटी रुपये खर्च करावे लागले आहेत. त्यातील जवळपास ९० कोटी रुपये टँकरवारीवर खर्च झाले. तर, ५० कोटींमधून नळ योजनांची विशेष दुरुस्ती करण्यात आली.यावर्षीचा उन्हाळा राज्याला ‘दुष्काळदाह’ देऊन गेला. ग्रामीण व नागरी भागातील पिण्याच्या पाणीटंचाई निवारणार्थ राज्यभरात विविध उपाययोजना राबविण्यात आल्यात. अमरावती, नागपूर, नाशिक, कोकण व औरंगाबाद या विभागात पाणीटंचाई निवारणार्थ राबविलेल्या उपाययोजनांवरील खर्च भागविण्यासाठी शासनाने २१२ कोटी २९ लक्ष रुपयांचा निधी वितरित केला आहे. त्यातील ८९.२० कोटींचा निधी टँकरने पाणीपुरवठा करण्यावर खर्च झाला आहे. राज्यातील सहाही विभागांत मोठ्या प्रमाणात टँकरने पेयजलाचा पुरवठा करण्यात आला.राज्यात नोव्हेंबर ते जुलैच्या मध्यावधीपर्यंत १० हजारांपेक्षा अधिक गाव वस्त्यांमध्ये १२ हजार टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. त्यात मराठवाड्यात सर्वाधिक टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. ८९ कोटींच्या टँकरवारीमध्ये ५७.१८ कोटी औरंगाबाद विभागावर खर्च करण्यात आले. नाशिक विभागात २४.७६ कोटी तर अमरावती विभागात ६.५० कोटी रुपये खर्च झाला.<जीपीएस प्रणाली आवश्यकज्या टँकरवर जीपीएस प्रणाली बसविली आहे, त्या टँकरच्या फेऱ्यांची नोंद करण्यात आली. अशा टँकर वाहतूकधारकांनाच देयके दिली जातील. पाणीपुरवठा करणाऱ्या ज्या टँकरवर जीपीएस प्रणाली बसविलेली नाही किंवा जीपीएस प्रणाली बंद असेल अशा फेऱ्या बनावट ठरणार आहेत. अशा बनावट फेऱ्यांसाठी देयके दिली जाऊ नये, असे निर्देश पाणीपुरवठा स्वच्छता विभागाने दिले आहेत.