शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकारला गॅसवरील कराद्वारे २,११० कोटी महसूल, माहिती अधिकारात वास्तव उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 03:17 IST

नागरिकांना गॅसचे अनुदान सोडण्यास सांगणारे केंद्र सरकार स्वत: मात्र, काही सोडायला तयार नसून पेट्रोल डिझेलपाठोपाठ सामान्यांच्या वापराच्या स्वयंपाकाच्या गॅसवरील कराद्वारे दरवर्षी २,११० कोटी रुपयांचा महसूल गोळा करीत आहे़

पुणे : नागरिकांना गॅसचे अनुदान सोडण्यास सांगणारे केंद्र सरकार स्वत: मात्र, काही सोडायला तयार नसून पेट्रोल डिझेलपाठोपाठ सामान्यांच्या वापराच्या स्वयंपाकाच्या गॅसवरील कराद्वारे दरवर्षी २,११० कोटी रुपयांचा महसूल गोळा करीत आहे़ माहिती अधिकारात हे वास्तव उघड झाले आहे़केंद्र सरकारच्या सीमा शुल्क विभागाला माहिती अधिकार कायद्याखाली अर्ज करुन केंद्र सरकार अनुदानित गॅसवर किती आयात शुक्ल आकारते?, किती सीमा शुल्क आकारणी केली जाते, त्याची २०१२ -१३ ते २०१६-१७ अशी माहिती मागितली होती़ पण, सुरुवातीला माहिती उपलब्ध नसल्याचे कळविले गेले़ पहिले अपील केल्यानंतर ती उपलब्ध झाली़ उत्तरात केंद्र सरकार अनुदानित गॅस सिलेंडरवर वर्षाला २,११० कोटी रुपये कर मिळवीत असल्याचे मान्य केले, असे माहिती अधिकार कार्यकर्ते आणि सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी सांगितले.केंद्र सरकारने माहिती अधिकारात दिलेल्या उत्तरानुसार २०१२-१३ मध्ये अनुदानित गॅसवर १६०३़९३ कोटी रुपये कर मिळविला़ त्यावर शिक्षण कर ३३़५५ कोटी तसेच उच्च शिक्षण कर १६़३३ कोटी असा एकूण १६५४़ १६ कोटी रुपये कर गोळा केला होता़ २०१३ -१४ मध्ये एकूण १६१३़०७ कोटी, २०१४ -१५ मध्ये १९९७़८७ कोटी रुपये कर जमा केला गेला़ त्यानंतर २०१५-१६ पासून शिक्षण कर रद्द करण्यात आला़शिक्षण कर रद्द केल्यानंतरही २०१५ -१६ मध्ये १८९८़३२ कोटी रुपये आणि २०१६ -१७ मध्ये २११०़२७ कोटी रुपये कर केंद्र सरकारने मिळविला आहे, असे वेलणकर यांनी सांगितले.अनुदानात कपातगॅसच्या अनुदानासाठी बँक खाते लिंक केल्यानंतर सुरुवातीला बँक खात्यात जवळपास १८० रुपये जमा होत असत़ त्यानंतर त्यात कपात होत गेली़ आता ही रक्कम १०० रुपयांपर्यंत कमी झाली आहे़ दुसरीकडे दर महिन्याला गॅस सिलेंडरच्या किमतीत नियमितपणे वाढ होताना दिसत आहे़माहिती अधिकारात केंद्र सरकारने मुळात माहिती दिली नाही़ अपिलात गेल्यावर जी माहिती दिली तीही अपूर्ण व अर्धवट आहे़ ती नको आहे़ त्यासाठी आता दुसरे अपील करणार आहे़- विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंचइंधन करापोटी वर्षाला१ लाख कोटी महसूलआंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्या असतानाच तेल कंपन्यांच्या नफ्यात मात्र ४० टक्के वाढ झाली आहे़ मागील तीन वर्षांत नफ्यासह इंधनासाठी नागरिकांवर टाकलेल्या वाढीव कराच्या बोजामुळे केंद्र शासनाचे उत्पन्न दुपटीने वाढले असून करापोटी केंद्र सरकारला १ लाख १५ हजार ६०० कोटी रुपये मिळत आहेत.