शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील २१ विद्यार्थी जाणार जपान दौऱ्यावर

By admin | Updated: February 9, 2015 05:08 IST

केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या इन्स्पायर अ‍ॅवॉर्ड योजनेंतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेतून राज्यातील २१ विद्यार्थ्यांची जपान दौऱ्यासाठी निवड झाली आहे

भीमगोंडा देसाई , कोल्हापूरकेंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या इन्स्पायर अ‍ॅवॉर्ड योजनेंतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेतून राज्यातील २१ विद्यार्थ्यांची जपान दौऱ्यासाठी निवड झाली आहे. येत्या मे महिन्यात ते जपानला जाणार असून तेथील प्रगत सायन्स आणि तंत्रज्ञानाची विद्यापीठे, इन्स्टिट्यूट यांना ते भेट देतील. विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयावरील तेथील तज्ज्ञांच्या मार्गदर्शन वर्गात त्यांना सहभागी होता येईल.विज्ञान, तंत्रज्ञानाबद्दल जिज्ञासा वाढावी, वैज्ञानिकदृष्टी वाढून शास्त्रज्ञ निर्माण व्हावेत यासाठी ‘इन्स्पायर अ‍ॅवॉर्ड योजनेंतर्गत गेल्या तीन वर्षांपासून विविध पातळ््यांवर स्पर्धा घेण्यात येतात. तत्कालीन राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी ही संकल्पना मांडली होती. विज्ञान व तंत्रज्ञानातील नावीन्यपूर्ण उपकरण तयार करून जिल्हा, राज्य, राष्ट्रीय पातळीवरील या स्पर्धांमध्ये सहावी ते दहावीचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. गेल्या वर्षी आॅक्टोबर महिन्यात दिल्लीत झालेल्या स्पर्धेत कसबा आरळे (ता. करवीर) येथील माध्यमिक विद्यालयातील सुरेश जयंत पवार याने तयार केलेली ‘आधुनिक बैलगाडी’, कोल्हापुरातील महाराष्ट्र हायस्कूलच्या यश विजय अंबोळे याने तयार केलेली ‘दुर्बीण’ तर शा. कृ. पंत वालावलकर हायस्कूलच्या अनुप योगेंद्र कुलकर्णी याने तयार केलेला ‘यांत्रिकी ऊर्जा निर्मिती यंत्र’ही उपकरणे मांडण्यात आली. त्यामध्ये राष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी तिसरा क्रमांक मिळविला. त्यामुळे या तिघांची जपान दौऱ्यासाठी निवड झाली आहे. सकुरा एक्स्चेंज प्रोग्रॅम आॅफ जपानच्यावतीने या दौऱ्याचे नियोजन केले आहे. या तिघांसह राज्यातील २१ जण मेमध्ये ९ ते १६ आणि १६ ते २३ अशा दोन टप्प्यांत जपान दौऱ्यावर जाणार आहेत. हे विद्यार्थी बी.एस्सी., एम.एस्सी. झाल्यानंतर दरवर्षी ८० हजार रुपये, तर पीएच.डी. केल्यास एक लाख रुपये शिष्यवृत्तीही मिळणार आहे.