शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

मेहकर तालुक्यात वीज पडून २१ मजूर जखमी

By admin | Updated: August 30, 2014 23:52 IST

मेहकर तालुक्यातील शिवपूरी शिवारात वीज पडून २१ मजूर जखमी.

मेहकर (जि. बुलडाणा) : शेतात काम करुन एकत्रपणे जांभळाच्या झाडाखाली जेवायला बसलेल्या मजुरांच्या अंगावर वीज पडल्याने २0 जण जखमी तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना तालुक्यातील शिवपूरी शिवारात ३0 ऑगस्ट रोजी दुपारी ३.३0 वाजताच्या सुमारास घडली. दरम्यान, सर्व जखमींना स्थानिक ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. मौजे बरटाळा येथील पुंडलिक शंकर गायकवाड यांच्या शिवपूरी शिवारातील शेतात काही मजूर काम करीत होते. दुपारी जेवणासाठी सर्व मजूर जांभळाच्या झाडाखाली एकत्रीत बसले. त्याचवेळी विजेचा कडकडाट होऊन झाडाखाली बसलेले ७ पुरूष व १४ महिला अशा एकुण २१ मजुरांच्या अंगावर वीज कोसळली. त्यामध्ये पुंडलिक गायकवाड हे गंभीर जखमी झाले. लक्ष्मीबाई नागनाथ आव्हाळे (६0), रुख्मिनी रमेश खंदारे (२५), लता सुभाष बोरकर (३५), भगवान लक्ष्मण अंभोरे (४५), भरत प्रकाश नाडे (२२), विद्या भगवान अंभोरे (१६), उषा भरत नाडे (१८), संगिता गोपाल नाडे (२२), छाया विठ्ठल गायकवाड, सगुना दादाराव नाडे (३५), संगिता भगवान अंभोरे (३५), द्वारका किसन इंगळे (६५), जिजाबाई नामदेव नाडे (६५), सुशमा नंदा अंभोरे (२५), पंचफुला गजानन नाडे (२५), गणेश दादाराव नाडे (१५), सोनु सुभाष बोरकर (१७), गजानन भगवान अंभोरे (१६), गजानन हरिभाऊ नाडे (२७) व सत्यभामा हरिभाऊ नाडे (६0) हे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारार्थ मेहकर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.