शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

४३ शहरांना २०७७.९६ कोटी

By admin | Updated: December 15, 2015 04:02 IST

केंद्र शासनाने महाराष्ट्रातील ४३ शहरांसाठी अटल मिशन फॉर रिज्युव्हिनेशन अ‍ॅण्ड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन (अमृत) अभियानांतर्गत २०७७.९६ कोटींच्या वार्षिक कृती आराखड्यास मंजुरी

नागपूर : केंद्र शासनाने महाराष्ट्रातील ४३ शहरांसाठी अटल मिशन फॉर रिज्युव्हिनेशन अ‍ॅण्ड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन (अमृत) अभियानांतर्गत २०७७.९६ कोटींच्या वार्षिक कृती आराखड्यास मंजुरी दिली आहे. या अभियानाच्या माध्यमातून पाणीपुरवठा, मलनिस्सारण, पर्जन्य जलवाहिनी, नागरी परिवहन व हरित क्षेत्र विकास या मूलभूत सुविधांचा विकास करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत एका निवेदनाद्वारे केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या निवेदनाद्वारे सांगितले की, केंद्र सरकारच्या या योजनेत देशातील ५०० शहरांचा समवेश आहे. ज्यांची लोकसंख्या १ लाखाच्या वर आहे. य शहरातील सुविधांचा स्तर उंचावणे आणि पायाभूत सुविधांचा विकास करण्याच्या उद्देशाने हे अभियान राबविण्यात येणार आहे. अमृत अभियानांतर्गत अभियान शहरामध्ये पाणीपुरवठा, मलनिस्सारण, पर्जन्य जलवाहिनी, नागरी परिवहन व हरित क्षेत्र विकास या मूलभूत सुविधांचा विकास करण्यात येणार आहे. केंद्र शासन पुरस्कृत अभियानांतर्गत समावेश असलेल्या राज्यातील ४३ अभियान शहरांमध्ये नागरी सेवांचा स्तर उंचावण्याच्या अनुषंगाने पायाभूत सुविधांची निर्मिती करण्याबाबतच्या केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सन २०१५-१६ या आर्थिक वर्षासाठीचा २०७७.९६ कोटींचा राज्य वार्षिक कृती आराखडा केद्र शासनास सादर करण्यात आला होता. केंद्र शासनाच्या शिखर समितीने १० डिसेंबर २०१५ रोजीच्या बैठकीत राज्याच्या सदर वार्षिक कृती आराखड्यास मान्यता दिलेली आहे. राज्य वार्षिक कृती आराखड्यामध्ये पाणीपुरवठा विषयक प्रकल्पांना प्राधान्य देण्यात आले आहे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदनाद्वारे सांगितले. (प्रतिनिधी)पाणीपुरवठा योजनेसाठी सौरऊर्जेचा वापरपाणीपुरवठा योजनेतील दुरुस्ती व देखभालीचा खर्च कमी करण्यासाठी सौरऊर्जेचा वापर करण्याच्या राज्याच्या नाविण्यपूर्ण संकल्पनेसही मान्यता देण्यात आली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.