यवतमाळ : यंदा झालेल्या बदल्या सोयीच्या नाहीत, असे सांगत नव्या ठिकाणी बदली मिळविण्यासाठी २०५ पोलीस निरीक्षकांनी केलेले अर्ज महासंचालकांच्या अध्यक्षतेखालील आस्थापना मंडळाने फेटाळले आहेत.यंदाच्या सामान्य बदल्या जाहीर झाल्यानंतर अडीचशेपेक्षा अधिक पोलीस निरीक्षकांनी आपल्या सोयीने बदल्या द्याव्या म्हणून महासंचालक कार्यालयाकडे २५ मे ते ५ जून या काळात अर्ज केले होते. त्यात प्रत्येकानेच कौटुंबीक, आजार व अन्य कारणे दिली होती. निरीक्षकाने इच्छा दर्शविलेल्या घटकातील रिक्त जागा, तो सध्याचे नियुक्तीचे ठिकाण सोडू इच्छित असलेल्या जिल्ह्यातील निरीक्षकांची उपलब्ध संख्या, सोयीच्या बदलीसाठी दर्शविलेल्या कारणाची गंभीरता अशा विविध बाबींचा विचार करून महासंचालकांच्या अध्यक्षतेखालील आस्थापना मंडळाने तब्बल २०५ पोलीस निरीक्षकांचे विनंती अर्ज फेटाळण्याचा निर्णय घेतला. केवळ ५२ पोलीस निरीक्षकांचे बदलीचे विनंती अर्ज मान्य झाले. (प्रतिनिधी)
२०५ पोलिसांच्या बदल्यांना ठेंगा
By admin | Updated: July 14, 2016 03:43 IST