शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

२००२ मुंबई बाँबस्फोट प्रकरण : १० जण दोषी, तिघांची निर्दोष सुटका

By admin | Updated: March 29, 2016 12:23 IST

डिसेंबर २००२ ते मार्च २००३ साली मुंबईत झालेल्या साखळी बाँबस्फोटप्रकरणात टाडा न्यायालयाने १० जणांना दोषी ठरवले असून तिघांची पुराव्याअभावी सुटका करण्यात आली.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २९ - मुंबईत डिसेंबर २००२ ते मार्च २००३ साली झालेल्या बाँबस्फोटप्रकरणात टाडा न्यायालयाने १० जणांना दोषी ठरवले असून तीन आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली आहे. या १० दोषींना उद्या शिक्षा सुनावण्यात येणार आहे.
डिसेंबर २००२ व मार्च २००३ मध्ये मुंबईतील मुलुंड, मुंबई सेंट्रल आणि विलेपार्ले येथे साखळी स्फोट झाले होते. त्याप्रकरणी आज टाडा कोर्टाने निकाल सुनावत १० आरोपींना पोटा, शस्त्रास्त्रे कायदा, रेल्वे कायद्याअंतर्गत दोषी ठरवले. तर नदीम पालोबा, हरून लोहार आणि अदनान मुल्ला या तिघांची पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली.
डिसेंबर २००२ ते मार्च २००३ या अवघ्या तीन महिन्यांच्या कालावधीत तीन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या भीषण स्फोटांनी मुंबईकर हादरले. मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनच्या इमारतीतील मॅकडोनाल्ड्समध्ये ६ डिसेंबर २००२ रोजी पहिला स्फोट झाला तर २७ जानेवारी २००३ साली विलेपार्ले पूर्वेकडील गजबजलेल्या मार्केटमध्ये दुसरा स्फोट झाला. तिसरा व शेवटचा स्फोट १३ मार्च २००३ रोजी मुलुंड स्थानकातील गर्दीने खचाखच भरलेल्या कर्जत लोकलमध्ये झाला. या तिनही स्फोटांमध्ये १२ जण ठार २७ जण गंभीररित्या जखमी झाले.