शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

दुधाचे २०० टँकर मुंबईकडे रवाना

By admin | Updated: June 3, 2017 03:48 IST

साखर आणि दुधाचे आगार असणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी उत्स्फूर्तपणे संपात सहभागी झाल्याने दूध संकलनावर मोठा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : साखर आणि दुधाचे आगार असणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी उत्स्फूर्तपणे संपात सहभागी झाल्याने दूध संकलनावर मोठा परिणाम झाला आहे. शुक्रवारी कडक पोलीस बंदोबस्तात दुधाचे २०० टँकर कसेबसे मुंबईकडे रवाना करण्यात आले. भाजीपाल्यासह इतर सर्व शेतमालाची आवक रोडवल्याने दर अव्वाच्या सव्वा वाढल्याचे चित्र बाजारपेठेत पाहायला मिळत आहे.संपाचा थेट फटका कोल्हापूर जिल्ह्यातील दूध संघांना बसला आहे. ‘गोकूळ’, ‘वारणा’सह ‘स्वाभिमानी’ दूध संघाच्या रोजच्या संकलनात तब्बल एक लाख लीटरहून अधिक घट झाली आहे. भाजीपाल्याच्या दरात कमालीची वाढ झाली असून, बाजार समितीमध्ये शुक्रवारी केवळ तीन ट्रक कांदा व तेवढीच बटाट्याची आवक झाल्याने आजपासून या मार्केटबरोबरच भाजीपाला मार्केट कोलमडणार हे निश्चित आहे. सांगलीत वाहतूक रोखली सांगली : जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही संपाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वाळवा, तासगाव, पलूस, मिरज, आटपाडी तालुक्यात दूध व भाजीपाला वाहतूक रोखण्यात आली. भाजीपाल्याची आवक घटली आहे. शेतकऱ्यांनी दूध केंद्रांवर दूध न घालता त्याचे लोकांना वाटप केले. शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा  पाहून सहकारी दूध संस्था आणि खासगी दूध संकलन केंद्रांनी संकलन बंद केले. कवठेएकंद (ता. तासगाव) येथे शेतकऱ्यांनी डविलेले सुमारे हजार लीटर दूध गरजूंना वाटण्यात आले. सामूहिक मुंडण सटाणा तालुक्यातील (जि. नाशिक) शेतकऱ्यांनी सामूहिक मुंडण करून सरकारचा निषेध नोंदविला, तर बुलडाणा जिल्ह्यातील धाड येथे दुधाचे टँकर अडवून महिला व शेतकऱ्यांनी दुधाने अंघोळ केली.संघाची टीकाशेतकऱ्यांवर संप करण्याची वेळ यावी, हे दुर्दैवी आहे. मात्र या संपामागे विरोधकांची चिथावणी आहे, अशी टीका राष्ट्रीय सवयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते आणि स्वयंसेवक मा.गो. वैद्य यांनी केली आहे.