शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

‘सेवाहमी’च्या २०० सेवा आॅनलाइन

By admin | Updated: December 1, 2015 01:21 IST

सेवा हमी कायद्यांतर्गत येत्या २६ जानेवारीपर्यंत २०० सेवा आॅनलाइन करण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली.

मुंबई : सेवा हमी कायद्यांतर्गत येत्या २६ जानेवारीपर्यंत २०० सेवा आॅनलाइन करण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली. येथील हॉटेल ताजमध्ये स्मार्ट हेल्थ, स्मार्ट गव्हर्नन्स, स्मार्ट सिटीसाठी डिजिटल तंत्रज्ञान या विषयावर ई-इंडिया महाराष्ट्र समिट आयोजित करण्यात आली होती. या समिटच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते.केंद्रीय नगरविकास विभागाचे सचिव दुर्गाशंकर मिश्रा, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया, मुंबई महापालिकेचे आयुक्त अजय मेहता, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव व्ही.के. गौतम, नगर विकास विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर आदी मान्यवर उपस्थित होते. शहरीकरणाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. राज्य शासनाने स्मार्ट सिटींवर भर दिला असून, नागरिकांना उत्कृष्ट पायाभूत सुविधा, गुणवत्तापूर्ण राहणीमानासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. शहरांच्या शाश्वत विकासाचा आराखडा तयार करण्यात आला पाहिजे, असे सांगून ते म्हणाले की, सिडकोच्या नवी मुंबई येथील देशातील पहिल्या स्मार्ट सिटीचा शुभारंभ लवकरच करण्यात येणार आहे. स्मार्ट शहरांबरोबरच स्मार्ट गावे विकसित होणे आवश्यक आहे. (विशेष प्रतिनिधी)मुंबई पॅटर्न राज्यात ‘इझ आॅफ डुर्इंग बिझनेस’साठी इमारतींच्या प्रकल्प आराखड्यांना मंजुरी देण्यासाठी मुंबई महापालिकेने जी पद्धती अवलंबली आहे, ती पद्धत राज्यातील अन्य महापालिका व नगरपालिकांमध्ये राबविण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. भाटिया यांनीही नवी मुंबई स्मार्ट सिटी प्रकल्पाचे सादरीकरण केले.