शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

५ लाख रुग्णांसाठी २०० कोटींचे अर्थसहाय्य

By admin | Updated: June 1, 2016 15:51 IST

सर्वसामान्य गरीब कुटुंबातील व अडचणीत सापडलेल्या रूग्णांना आधार देण्यासाठी भाजप सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री सहाय्यता निधी/कक्ष सुरू करण्यात आले

ऑनलाइन लोकमतसोलापूर, दि. 1-  सर्वसामान्य गरीब कुटुंबातील व अडचणीत सापडलेल्या रूग्णांना आधार देण्यासाठी भाजप सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री सहाय्यता निधी/कक्ष सुरू करण्यात आले आहे. या कक्षाच्या माध्यमातून दोन वर्षात ५ लाख रूग्णांसाठी २०० कोटीचे अर्थसहाय्य केल्याची माहिती मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे प्रमुख ओमप्रकाश शेटे यांनी दिली़लोकमंगल जीवक हॉस्पीटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबीराच्या उदघाटनाप्रसंगी त्यांनी ही माहिती दिली़. राज्यात भाजपाने सत्ता स्थापन केल्यानंतर नव्या योजनांचा समावेश करण्यात आला़ या योजनेत गरजू व अडचणीत सापडलेल्या रूग्णांना आर्थिक पाठबळ देण्याच्या दृष्टीकोनातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष सुरू केले़ या कक्षाच्या माध्यामातून मागील दोन वर्षात राज्यातील ४७५ धर्मादाय रूग्णालयातून १८० कोटी रूपयांचे मोफत उपचार देण्यात आले आहेत़ कॅन्सर, हार्टअटॅक, मेंदूरोग, किडनी, एडस आदी गंभीर आजारावर ही मदत देण्यात आली़ सर्वाना सुरळीत व विना अडचण रूग्णसेवा मिळावी यासाठी प्रत्येक जिल्ह्यात आता आरोग्य सेवकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. पुढे बोलताना शेटे म्हणाले की, मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे काम नियमित वाढत आहे़ वैद्यकीय मदत मिळविण्यासाठी हजारो रूग्ण प्रयत्न करीत आहेत़ या गरजूना मदत व्हावी व कक्षाचा विस्तार वाढविण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस हे स्वत: प्रयत्न करीत आहेत़ पुढील काळात विनाअडचण सर्व रूग्णांना उपचार वेळेत मिळतील यासाठी प्र्रयत्न करणार आहोत असेही शेटे यांनी सांगितले़ यावेळी आ़ सुभाष देशमुख, भाजपाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, राजेंद्र मिरगणे, लोकमंगल बँकेचे संचालक अविनाश महागांवकर, इंद्रजित पवार आदी मान्यवर उपस्थित होते.