शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पीककर्जासाठी २०० कोटी मिळणार

By admin | Updated: June 25, 2016 03:40 IST

राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची नाजूक आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन राज्य शासनाने ‘नाबार्ड’ कडे २०० कोटींची हमी देण्याचा प्रस्ताव दिला आहे.

औरंगाबाद : राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची नाजूक आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन राज्य शासनाने ‘नाबार्ड’ कडे २०० कोटींची हमी देण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे जिल्हा बँकांना पीककर्जासाठी पाच- सहा दिवसांत २०० कोटी रुपये उपलब्ध होतील, अशी माहिती सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांनी शुक्रवारी न्या. आर. एम. बोर्डे आणि न्या. के. एल. वडणे यांच्या खंडपीठात दिली. यापूर्वीच्या सुनावणीच्या वेळी राज्य शासनाने अल्पभूधारक, अत्यल्प भूधारक, खते आणि बी-बियाणे याची माहिती सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार गिरासे यांनी खंडपीठात लेखी माहिती सादर केली.राज्यात ६७ लाख ९ हजार ३४ अल्पभूधारक, तर ४० लाख ५२ हजार ३१७ अत्यल्प भूधारक आहेत. तसेच २९ लाख ३७ हजार ६१३ इतर शेतकरी आहेत. असे एकूण १ कोटी ३६ लाख ९८ हजार ९६५ शेतकरी आहेत. त्यांच्यापैकी ८० टक्के शेतकऱ्यांना पीककर्ज पुरवठा करण्याचा राज्य शासन प्रयत्न करीत आहे. खरीप कर्जासाठी शासनाला ३७ हजार ४४७ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. १५ जून २०१६ पर्यंत त्यापैकी १६ हजार ४२२ कोटींचे म्हणजे ८० टक्क्यांपैकी जवळपास ४४ टक्के कर्ज वाटप झाले आहे. यावर्षी १ लाख ४१ हजार ६६२ नवीन शेतकऱ्यांना ८९९ कोटी रुपयांचे पीककर्ज दिले आहे. (प्रतिनिधी)१७.९२ लाख क्ंिवटल बियाणे उपलब्धखरिपासाठी यावर्षी १४.९९ लाख क्ंिवटल बियाणांची आवश्यकता आहे. सध्या बाजारात १७.९२ लाख क्ंिवटल बियाणे उपलब्ध आहे. त्यापैकी ११.९८ लाख क्ंिवटल बियाणे शेतकऱ्यांनी आतापर्यंत खरेदी केले आहे. बियाणांच्या नियंत्रणासाठी राज्यस्तरापासून विभागीय आणि जिल्हास्तरीय तसेच तालुकास्तरापर्यंत भरारी पथके नेमण्यात आली आहेत. तालुकास्तरीय समिती तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत आहे. तसेच राज्याला ११.१४ लाख मेट्रिक टन खतांची आवश्यकता आहे. केंद्र शासन १३.०२ लाख मे. टन खत पुरविणार असून त्यापैकी ५ लाख ४ हजार मे. टन खत राज्य शासनास मिळाले आहे, असे गिरासे यांनी सांगितले.