शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

‘जुन्या इमारतींसाठी २०० कोटींचा निधी’

By admin | Updated: April 2, 2016 01:29 IST

अर्थसंकल्पात मुंबईकरांच्या घरांसाठी उदार धोरण आखत विविध योजनांची घोषणा गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी केली. त्यात जुन्या घरांसाठी २०० कोटी रु पये, बी.डी.डी. चाळींची

मुंबई : अर्थसंकल्पात मुंबईकरांच्या घरांसाठी उदार धोरण आखत विविध योजनांची घोषणा गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी केली. त्यात जुन्या घरांसाठी २०० कोटी रु पये, बी.डी.डी. चाळींची योजना, धारावी पुनर्वसन प्रकल्प, गिरणी कामगारांच्या घरांसाठी दोन वेळा लॉटरी आदींचा समावेश आहे.२०१६-१७च्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना मेहता म्हणाले की, सरकारने सेस इमारतींसाठी सर्वाधिक निधी उपलब्ध करून दिला आहे. मुंबईसाठी उदार धोरण राबवत असताना मुंबईतील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींसाठी २०० कोटी रु पये खर्च करणार आहे. पाच वर्षांत म्हाडा, एमएमआरडीए आदी सहा एजन्सीमार्फत जवळपास ६ लाख ७३५ घरे उभारली जाणार आहेत. यातही मुंबईत म्हाडाच्या माध्यमातून १ लाख परवडणारी घरे उभारली जाणार आहे. बीडीडी चाळींच्या योजना पूर्ण केल्या जाणार आहेत. चाळीत अनेक पिढ्यांपासून राहणाऱ्या पोलिसांना तेथेच मालकी हक्काची घरे दिली जाणार आहेत. मात्र हा वाद न्यायालयात सुरू असल्यामुळे त्याला पूर्णत्व देता आले नाही. धारावीचा प्रकल्पही गती घेत आहे. १६ विकासकांनी त्यात सहभाग घेतला असून, त्याचे ई-टेंडरिंगही झाले आहे. धारावीतील एकही पारंपरिक उद्योग प्रकल्पाच्या बाहेर जाऊ दिला जाणार नाही. गिरणी कामगारांसाठी या वर्षात २ लॉटऱ्या काढल्या जाणार आहेत. त्याच्या कृती समितीबरोबर ४-५ दिवसांत मुख्यमंत्र्यांसह बैठक होऊन त्याला अंतिम रूप दिले जाणार आहे. मुंबईतील संक्रमण शिबिरांच्या बाबतीत ५ विकसकांनी सुमारे ८० कोटी ५० लाख रुपयांची रक्कम थकवली आहे. त्यांच्या विरोधात खटले दाखल केले असून, विशेष मोहिमेद्वारे कारवाई पूर्ण केली जाईल, असेही मेहता यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)