शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

२० वर्षांनी औषधविक्रेता निर्दोष!

By admin | Updated: November 6, 2015 00:58 IST

‘एमआरपी’पेक्षा पाच रुपये अधिक आकारून औषधे विकल्याची तक्रार झाल्यामुळे यवतमाळ येथील एका औषधविक्रेत्याला २० वर्षे मन:स्ताप सहन करावा

नागपूर : ‘एमआरपी’पेक्षा पाच रुपये अधिक आकारून औषधे विकल्याची तक्रार झाल्यामुळे यवतमाळ येथील एका औषधविक्रेत्याला २० वर्षे मन:स्ताप सहन करावा लागला. १९९५मधील या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या औषधविक्रेत्याला निर्दोष सोडले. जाणीवपूर्वक पाच रुपये अधिक घेण्यात आले याचे पुरावे नसल्याचा लाभ औषधविक्रेत्याला मिळाला.मोहन जोशी (७३) असे औषधविक्रेत्याचे असून त्यांचे श्रीराम मेडिकल स्टोअर्स आहे. त्याच दुकानात ही घटना घडली. विशेष न्यायालयाने ३ जून १९९९ रोजी मोहन जोशी यांना जीवनावश्यक वस्तू कायद्याच्या कलम ७, ३ व औषधी द्रव्ये आदेशमधील कलम २४ व १६ अंतर्गत १ वर्ष सश्रम कारावास व ५००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन महिने अतिरिक्त सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली होती. याविरुद्ध जोशींनी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायमूर्ती प्रदीप देशमुख यांनी विविध बाबी लक्षात घेत, आॅक्टोबरमध्ये विशेष न्यायालयाचा वादग्रस्त आदेश रद्द करून आरोपीला निर्दोष सोडण्याचे निर्देश दिले.अशी केली तक्रार३ नोव्हेंबर १९९५ ला आर्णी येथील रवींद्र चल्लावार यांनी श्रीराम मेडिकल स्टोअर्समधून ‘सेफ २५०’ या सहा कॅप्सुल्सची स्ट्रिप ३८.५० रुपयांत विकण्यात आली. स्ट्रिपवर ३३.५० रुपये एमआरपी होती. दुकानदाराने पाच रुपये जास्त घेतल्याचे लक्षात आल्यानंतर चल्लावार यांनी अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार पाठविली. त्यावरून निरीक्षकांनी दुकानातून बिलाची प्रतिलिपी जप्त केली. न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.