शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना २० हजार कोटींचे विमाकवच

By admin | Updated: April 19, 2016 04:11 IST

नैसर्गिक आपत्ती, कीड-रोग व अन्य कारणांमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र शासनाने जाहीर केलेली ‘प्रधानमंत्री पीक विमा योजना’

मुंबई : नैसर्गिक आपत्ती, कीड-रोग व अन्य कारणांमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र शासनाने जाहीर केलेली ‘प्रधानमंत्री पीक विमा योजना’ यंदाच्या खरीप हंगामापासून राज्यात राबविण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना २० हजार कोटींचे विमाकवच लाभेल, अशी माहिती कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.आजवर कर्ज घेणाऱ्या ३५ ते ४० टक्के शेतकऱ्यांना पीक विमा घेता येत होता; मात्र आता कर्ज न घेणाऱ्या शेतकऱ्यांनाही पीक विमा घेता येणार आहे. त्यामुळे या निर्णयाचा फायदा आता सर्व शेतकऱ्यांना होेईल. खरिपाच्या पिकासाठी शंभरी २ रुपये, रब्बीच्या पिकासाठी शंभरी दीड रुपया आणि खरीप व रब्बीच्या नगदी पिकांसाठी व फळबागांसाठी शंभरी ५ रुपये किंवा वास्तवदर्शी दरापैकी जे कमी असेल तेवढा हप्ता म्हणून भरावा लागेल. हप्त्याची बाकीची रक्कम राज्य व केंद्र सरकार भरणार आहे. (विशेष प्रतिनिधी)जागेवर मिळणार रक्कमविमा कंपनीला नुकसानीचा फोटो पाठविल्यानंतर तीन ते चार दिवसांच्या आत विमा कंपनीचे अधिकारी संबंधित नुकसानीची पाहणी करून नुकसानभरपाईपोटी २५ टक्के रक्कम जागेवरच देतील. त्यानंतर बाकीची रक्कम कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर दिली जाईल. ज्यांनी कूळ म्हणून शेतीवर नोंद केली आहे, अशांना त्यांच्याच नावाने विम्याची रक्कम मिळेल.कृषी विमा योजना बंद राज्यात क्षेत्र (मंडळ/मंडळ गट/तालुका) हा घटक धरून राबविण्यात येत असलेली पूर्वीची राष्ट्रीय कृषी विमा योजना केंद्र सरकारने आता बंद केली आहे. त्याऐवजी प्रधानमंत्री पीक विमा ही नवीन योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेमुळे प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणारी हवामान आधारित पीक विमा योजना खरीप हंगामापासून राबविण्यात येणार नाही.