ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. 14 - पाटपन्हाळा मार्गावरील चौकेवाडी येथे एसटी बसचा अपघात झाला आहे. बस उलटली असून 20 प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. म्हैस आडवी आल्यामुळे चालकाने ब्रेक दाबल्याने हा अपघात झाला असल्याचं कळत आहे. जखमींना विविध रूग्णालयात दाखल करण्यात आलं असून उपचार सुरु आहेत.