शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

२०८ जखमींच्या उपचारासाठी २६ लाखांचा खर्च!

By admin | Updated: June 9, 2016 04:27 IST

एमआयडीसीतील प्रोबेस एंटरप्रायजेस या रासायनिक कंपनीत झालेल्या रिअ‍ॅक्टरच्या स्फोटात १२ जणांचा मृत्यू झाला

अनिकेत घमंडी,

डोंबिवली- एमआयडीसीतील प्रोबेस एंटरप्रायजेस या रासायनिक कंपनीत झालेल्या रिअ‍ॅक्टरच्या स्फोटात १२ जणांचा मृत्यू झाला होता, तर २०८ जण जखमी झाले होते. त्यातील १४ जणांची प्रकृती गंभीर होती. स्फोटातील दोन जखमी अजूनही उपचार घेत आहेत. दरम्यान, जखमींच्या उपचारासाठी २६ लाख रुपये खर्च आल्याची माहिती समोर आली आहे.जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर, प्रांताधिकारी अथवा कल्याणचे तहसीलदार यासंदर्भातील तपशील दोन दिवसांत वरिष्ठांना दिला जाणार आहे. सर्व माहिती एकत्र झाल्यानंतर तातडीने मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर, ते नुकसानभरपाईबाबत निर्णय घेणार आहेत. दरम्यान, या स्फोटात जखमी झालेल्यांमध्ये आजूबाजूच्या कंपन्यांमधील कर्मचारी, नागरिक होते. अजूनही उपचार घेत असलेल्या दोघांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती केडीएमसीच्या आरोग्य अधिकारी डॉ. स्मिता रोडे यांनी दिली.>माहिती संकलनाचे काम सुरूमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्फोटातील मृतांच्या वारसांंना, जखमी व नुकसान झालेल्यांना अजूनही भरपाई का जाहीर केली नाही, असा सवाल नागरिक करीत आहेत. प्रत्यक्षात मात्र अद्यापही माहिती संकलन करणे, खर्च निश्चित करणे, आदी काम सुरू आहे, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. विविध विभागांची १५ पथके ही माहिती गोळा करत आहेत. एका पथकात चार-पाच जण आहेत. त्या पथकांची माहिती घेणे, तपशील संकलित करणे आदी सर्व जबाबदारी प्रांताधिकारी व तहसीलदारांवर आहे.>बैठकीत काहीच निष्पन्न नाहीस्फोटासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी नेमलेल्या समितीची दुसरी बैठक बुधवारी झाली. मात्र, त्यातही काहीही स्पष्ट झाले नाही. या समितीने मागील आठवड्यात घटनास्थळी भेट दिली होती. तसेच तज्ज्ञांशी चर्चा झाली होती. स्फोटासंदर्भातील फॉरेन्सिक लॅबच्या रिपोर्टसह अन्य तांत्रिक बाबी स्पष्ट झाल्यानंतरच निश्चितपणे सांगता येईल, असे समितीतील सूत्रांनी सांगितले. या समितीला महिनाभरात अहवाल सादर करायचा असून आता १५ दिवस उरले आहेत.