शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातून 2 टन गोमांस जप्त

By admin | Updated: April 16, 2017 16:29 IST

धाराशिव जिल्ह्यातून पुण्यात गोमांस विक्रीसाठी आणत असलेला टेम्पो गोरक्षकांनी सापळा रचून पकडला

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 16 - धाराशिव जिल्ह्यातून पुण्यात गोमांस विक्रीसाठी आणत असलेला टेम्पो गोरक्षकांनी सापळा रचून पकडला आणि त्यातून 2 टन गोमांस जप्त करण्यात आले. अखिल भारतीय कृषी गोसेवा संघाने हा प्रकार उघडकीस आणला. याप्रकरणीचौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ट्रकचालक कलिमा अब्दुल कादर पालकर (वय वय 42, रा. लोहियानगर, गंजपेठ), क्लिनर हाजी हारून शेख (वय 30, रा. भाग्योदयनगर, कोंढवा) या दोघांसह गायी कापणारा, विकत घेणारा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अखिलभारतीय कृषी गोसेवा संघाचे सदस्य, मानद पशुकल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे.धाराशिव जिल्ह्यातील परंडा येथे कसाई महोल्ल्यात 12 गायी व वासरांची कत्तल करून ती कोंढवा येथील जुबेर कुरेशी व सलमान कुरेशी याच्या दुकानात विक्रीसाठी आणले जात असल्याची माहिती शिवशंकर स्वामी यांना मिळाली. त्यानुसार रविवार सकाळी सहा पासून गोरक्षकांनी चंदननगर येथे खराडी बायपासवर सापळा रचला. त्यांना आयशर टेम्पो एमएच 12 एचडी 7788 यातूनगोमांस वाहतूक होत असल्याचे दिसले. त्यांनी त्वरित पोलिसांना माहिती देऊन टेम्पोची पाठलाग सुरू केला. हा टेम्पो कोरेगाव पार्क येथे जर्मन बेकरीच्या जवळ पकडण्यात आला. पोलिसांनी चालकला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, हे गोमांस परंड्यावरून आणले असल्याची कबुली दिली. पोलिसांच्या समोर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल देशपांडे यांनी गाडीची तपासणी केली असता त्यातील मांस हे गायीचे असल्याचे सांगितले. त्यानुसार महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा सुधारित 1995चे कलम 5 ( क ), 9 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.