शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

विकास आराखड्यासाठी २ हजार ९६ कोटी

By admin | Updated: June 27, 2017 03:52 IST

मुंबई महापालिकेचा ‘प्रारूप विकास आराखडा २०३४’ हा अद्याप मंजूर व्हावयाचा असला तरी या आराखड्यातील तांत्रिकदृष्ट्या

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई महापालिकेचा ‘प्रारूप विकास आराखडा २०३४’ हा अद्याप मंजूर व्हावयाचा असला तरी या आराखड्यातील तांत्रिकदृष्ट्या मंजूर असलेल्या नागरी सेवा सुविधाविषयक बाबी तसेच महापालिका सुविधाविषयक आरक्षणांची अंमलबजावणी करण्यास महापालिकेने कंबर कसली आहे. यासाठी महापालिकेच्या २०१७-१८ च्या अर्थसंकल्पात एकूण २ हजार ९६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.मुंबई महापालिका प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, अर्थसंकल्पातील तरतुदींमधून विकास नियोजन रस्ते, कचरा विभक्तीकरण केंद्र, कचरा प्रक्रिया केंद्र, सार्वजनिक शौचालये, नवीन अग्निशमन केंद्र, उद्याने, खेळाची मैदाने, आरोग्यविषयक सोयीसुविधा, स्मशानभूमी, शालेय इमारती आदी नागरी सेवा-सुविधांचा विकास करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. या तरतुदींच्या अनुषंगाने विभाग स्तरावर करावयाच्या कामांची सूची व कृती आराखडा सादर करण्याचे निर्देश आयुक्त अजय मेहता यांनी संबंधित परिमंडळीय उपायुक्तांना दिले आहेत.महापालिका क्षेत्रासाठीच्या ‘सुधारित विकास आराखडा २०३४’ला अद्याप मंजुरी प्राप्त व्हायची आहे. मात्र असे असले तरी सद्य:स्थितीत दर्शविलेली जी आरक्षणे १९९१ च्या मंजूर सुधारित विकास आराखड्यात दर्शविलेली आहेत आणि ती जशीच्या तशी २०३४ च्या प्रारूप विकास आराखड्यात दर्शविण्यात आली आहेत; त्याचबरोबर सदर आरक्षित जागा महापालिकेच्या ताब्यातदेखील आली असून मोकळी आहे आणि याशिवाय ज्या आरक्षणाबाबत नियोजन समितीने कोणतेही बदल प्रस्तावित केलेले नाहीत, अशी आरक्षणे विकसित करण्यासाठी अंमलबजावणी कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.जे मोकळे भूखंड महापालिकेच्या ताब्यात असून त्यावर प्रारूप विकास आराखडा २०३४ मध्ये महापालिका चौकी, रोड डेपो, स्क्रॅप यार्ड यासारख्या महापालिका सुविधांसाठी आरक्षणे टाकण्यात आली आहेत; अशा मोकळ्या जागांबाबतदेखील अंमलबजावणी कार्यक्रम हाती घेण्यात येत आहे.१९६७ च्या मंजूर विकास आराखड्याची अंमलबजावणी १८ टक्के झाली होती, तर १९९१ च्या मंजूर विकास आराखड्याची अंमलबजावणी ३३ टक्के इतकी होती. ही अंमलबजावणी नियोजनाच्या तुलनेत अपेक्षेनुरूप झाली नाही. ही बाब लक्षात घेत आता २०३४ च्या प्रारूप विकास आराखड्याची अंमलबजावणी अधिक परिणामकारक होण्यासाठी प्रशासनाने आतापासूनच वार्षिक नियोजनास सुरुवात केली आहे. त्यामुळे नागरी सेवा-सुविधांचे अधिक नियोजनबद्ध पर्याय नागरिकांना उपलब्ध होऊ शकतील, असा दावा महापालिकेने केला आहे.