शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

टेम्पोच्या धडकेने २ शाळकरी मुली ठार

By admin | Updated: July 8, 2016 18:41 IST

वाल्हे येथे मालवाहू टेम्पोने समोरून सायकलवरून येणाऱ्या तीन शालेय मुलींना धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन शालेय मुली जागीच ठार झाल्या आहेत.

ऑनलाइन लोकमतनीरा, दि. ८ : वाल्हे येथे मालवाहू टेम्पोने समोरून सायकलवरून येणाऱ्या तीन शालेय मुलींना धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन शालेय मुली जागीच ठार झाल्या आहेत. एक मुलगी गंभीर जखमी झाली आहे. शुक्रवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास वाल्हे येथील सुकलवाडी फाट्यानजीक बोल्हाईच्या चढावर असलेल्या उताराला पालखी मार्गावर हा अपघात घडला. या अपघातात मृत पावलेल्या दोन्ही शालेय मुलींची नावे निकिता सुनील पवार (वय १५) आणि अमृता विश्वास सातपुते (वय १४) अशी असून ऐश्वर्या बंडू पवार (वय १५) असे जखमी झालेल्या मुलीचे नाव आहे. सुकलवाडीमध्ये राहणाऱ्या दोन्ही मुलींच्या अपघाती मृत्यूमुळे वाल्हे परिसरात शोककळा पसरली आहे.

याबाबत समजलेली प्राथमिक माहिती अशी : पुणे-पंढरपूर पालखी मार्गावरील वाल्हे (ता. पुरंदर) येथील सुकलवाडी फाट्याजवळ असलेल्या बोल्हाईच्या चढावर उताराला नीरा बाजूकडून जेजुरी बाजूकडे जाणाऱ्या मालवाहू टेम्पोने (एमएच ४२ / बी ४७८५) समोरून तीन सायकलवरून येणाऱ्या मुलींना धडक देऊन अपघात केला. अपघातात निकिता पवार आणि अमृता सातपुते या दोन्ही शाळकरी मुली जागीच ठार झाल्या. ऐश्वर्या पवार गंभीर जखमी झाली. या तिन्ही शाळकरी मुली सकाळी क्लासवरून घरी परतताना हा अपघात घडला.

अपघातानंतर या तिन्ही शाळकरी मुलींना उपचारासाठी जेजुरीच्या शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, शासकीय रुग्णालयात उपचारासाठी वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नव्हते. त्यामुळे नातेवाईक आणि ग्रामस्थ संतप्त झाले होते. त्यामुळे काही काळ रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले असल्याची माहिती समजते. जखमी ऐश्वर्या पवार हिच्यावर खासगी रुग्णालयात तातडीने उपचार सुरू करण्यात आले. अपघातानंतर टेम्पोचालक फरार झाला असल्याची माहिती समजते.