शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

२ लाख ६५ हजार विद्यार्थी गायब !

By admin | Updated: January 19, 2016 04:00 IST

मॅट्रिकोत्तर अभ्यासक्रम चालविणाऱ्या संस्था/ महाविद्यालयांमधून गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल २ लाख ६५ हजार मागासवर्गीय विद्यार्थी हजेरी पटावरून अचानक कमी झाले आहेत

यदु जोशी,  मुंबईमॅट्रिकोत्तर अभ्यासक्रम चालविणाऱ्या संस्था/ महाविद्यालयांमधून गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल २ लाख ६५ हजार मागासवर्गीय विद्यार्थी हजेरी पटावरून अचानक कमी झाले आहेत. हे विद्यार्थी कमी होण्याचा संबंध शिष्यवृत्ती घोटाळ्याशी लावला जात आहे. धक्कादायक म्हणजे, महाविद्यालयांची संख्या ३७३ ने घटली आहे. राज्यातील शैक्षणिक संस्थांना त्यांच्याकडे अनुसूचित जाती, ओबीसी, एसबीसी आणि व्हीजेएनटीचे किती विद्यार्थी आहेत, या बाबत आॅनलाइन नोंदणी करण्याचे आदेश सामाजिक न्याय विभागाने दिले होते. १५ जानेवारी २०१६ पर्यंत ही नोंदणी करायची होती. त्यानुसार ११ हजार ७१२ महाविद्यालयांनी नोंदणी केली. त्यांच्याकडे वरील चार प्रवर्गातील १४ लाख १२ हजार ४६४ विद्यार्थी असल्याचे त्यांनी नोंदविले आहे. या आकडेवारीचा उपयोग स्कॉलरशिप देण्यासाठी केला जातो. गेल्या वर्षी (२०१४-१५) १२ हजार ८५ महाविद्यालयांनी नोंदणी केली होती आणि त्यांच्याकडे वरील चार प्रवर्गातील १६ लाख ७७ हजार ६१० विद्यार्थी असल्याचे नोंदविले होते. यंदा ही संख्या २ लाख ६५ हजार १४६ ने कमी होऊन १४ लाख १२ हजार ४६४ वर आली आहे. या प्रवर्गातील केवळ एक विद्यार्थी असलेली तब्बल ४७५ महाविद्यालये आहेत. शिष्यवृत्तीच्या नावाखाली सरकारी तिजोरीची कोट्यवधी रुपयांनी लूट करण्यात येत असल्याचे नव्या सरकारच्या लक्षात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी विशेष टास्क फोर्स नेमणार असल्याचे जाहीर केल्याने विद्यार्थ्यांचे बोगस प्रवेश दाखविणाऱ्यांचे धाबे दणाणले. त्यामुळे विद्यार्थी संख्या २ लाख ६५ हजाराने कमी झाल्याचे स्पष्ट दिसते. याची दुसरी बाजू अशीही आहे की, इतकी मोठी विद्यार्थी संख्या दाखवून शिष्यवृत्तीच्या नावाखाली अनेक संस्थाचालक वर्षानुवर्षे मलिदा खात होते. राज्यातील खासगी तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक) कॉलेजांनी बोगस प्रवेश व अन्य क्लृप्त्या करून गेल्या ५-६ वर्षांत सरकारी तिजोरीवर ५०० कोटींचा डल्ला मारल्याचे वृत्त ‘लोकमत’ने रविवारच्या अंकात दिले होते. अल्पमुदतीच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांमधील कोट्यवधी रुपयांच्या शिष्यवृत्ती घोटाळ्याची चौकशी करणार असलेल्या विशेष टास्क फोर्सकडेच पॉलिटेक्निक शिष्यवृत्ती घोटाळ्याची चौकशी दिली जाईल. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ही माहिती दिली. अपर पोलीस महासंचालक के.व्यंकटेशम हे या टास्क फोर्सचे अध्यक्ष आहेत.