धुळे : तालुक्यातील नवलनगर येथे एका कुटुंबातील १६ जणांना दोन दिवसांपूर्वी पराठ्यातून विषबाधा झाली. त्यापैकी रविवारी सायंकाळी दोन बालकांचा मृत्यू झाला. तर इतरांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.नवलनगरच्या आदिवासी वस्तीत राहणारे संजय भिल, कल्पना भिल यांच्यासह अन्य दोन बालकांना पराठा खाल्याने दोन दिवसांपूर्वी विषबाधा झाली होती़ त्यांना धुळ्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ उपचार सुरू असताना एक अडीच वर्षीय बालक आणि एका वर्षाच्या बालिकेचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र त्यांची नावे कळू शकली नाहीत. (वार्ताहर)
विषबाधेने २ बालकांचा मृत्यू
By admin | Updated: January 26, 2015 04:15 IST