शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
2
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
3
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
4
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
5
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
6
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
7
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
8
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
9
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
10
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
11
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
12
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."
13
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
14
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
15
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
16
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
17
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
18
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
19
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
20
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!

२, ३, ४ जूनला राज्यात मुसळधार

By admin | Updated: May 28, 2017 04:29 IST

मान्सूनचे ३१ मेपर्यंत केरळमध्ये आगमन झाल्यानंतर तो वेगाने पुढे सरकणार असून २, ३, ४ जून रोजी राज्यात चांगला पाऊस होईल, तसेच राज्यात हंगामात सरासरीच्या तुलनेत

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : मान्सूनचे ३१ मेपर्यंत केरळमध्ये आगमन झाल्यानंतर तो वेगाने पुढे सरकणार असून २, ३, ४ जून रोजी राज्यात चांगला पाऊस होईल, तसेच राज्यात हंगामात सरासरीच्या तुलनेत १०२ टक्के पाऊस पडेल, असा अंदाज ज्येष्ठ कृषी हवामानतज्ज्ञ डॉ़ रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केला आहे़पश्चिमी वाऱ्याच्या जोरामुळे आणि द्रोणीय क्षेत्र उत्तरेकडे सरकल्याने नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच ३०-३१ मेपर्यंत दक्षिण अरबी समुद्र, मालदीव, कॅमरीन क्षेत्र आणि दक्षिण केरळमध्ये होण्याच्या दृष्टीने स्थिती अनुकूल असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे़ राज्यात २, ३ व ४ जून दरम्यान, ज्या ठिकाणी ६५ मिमीपेक्षा अधिक पाऊस होईल, तेथे पेरण्या लवकर करण्यास हरकत नाही़ या वर्षी वाऱ्याचा वेग कमी आढळल्याने, २० जून ते १० जुलैच्या दरम्यान पावसात खंड पडेल़ विदर्भ व मराठवाड्यात खंडाचा कालावधी मोठा राहण्याची शक्यता आहे़ आॅगस्ट व सप्टेंबरमध्ये चांगल्या पावसाची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले़अंदमानच्या समुद्रात नेहमीपेक्षा अगोदर आलेल्या मान्सूनचा मुक्काम अंदमानच्या समुद्रात बरेच दिवस होता़ दरवर्षी २५ मेपर्यंत श्रीलंकेपासून म्यानमारपर्यंत मान्सून येतो़ गतवर्षी राज्यात मान्सूनचे आगमन पूर्वेकडून झाले होते़ यंदा मात्र, अरबी समुद्रातील वाऱ्यांचा जोर अधिक असल्याने शुक्रवारी त्याने श्रीलंकेत प्रवेश करताना जोरदार तडाखा दिला आहे़ ठळक नोंदी...- जुलैच्या पहिल्या आठवड्यात खंड पडण्याची शक्यता. यवतमाळला अतिवृष्टी होण्याची शक्यता.- राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेश या परिसरात अतिवृष्टी, तर काश्मीर, उत्तर प्रदेश या पट्ट्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता.- पुढील वर्षापासून औरंगाबाद, नांदेडचे मॉडेल बनविण्याचा प्रयत्न.विदर्भात उष्णतेची लाट...राज्यात विदर्भात तुरळक ठिकाणी पुढील दोन दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता असल्याचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे़ रविवारी दक्षिण कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे़ २९ ते ३१ मेपर्यंत कोकण, गोव्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे़

डॉ़ साबळे यांनी व्यक्त केलेला पावसाचा अंदाज (मिमी)जून ते सप्टेंबर २०१७विभागसरासरीअंदाजटक्केवारीअकोला६८३़७६८३़७१००नागपूर९५८९५८१००यवतमाळ८८२९२६१०५शिंदेवाही११९११२४०१०४(चंद्रपूर)परभणी८१५८१५१००दापोली३३३९३५०७१०५निफाड४३२४५७१०६जळगाव६३९६५०१०१पाडेगाव३६०३६८१०२सोलापूर५४३५४३१००राहुरी४०६४०६१००पुणे५६६५९४१०५