शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

१९० प्रवासी रात्रभर विमानातच!

By admin | Updated: April 19, 2016 04:10 IST

कोलकाता येथून मुंबईला जाणाऱ्या स्पाईसजेटच्या विमानातील प्रवाशांना तांत्रिक कारणांमुळे संपूर्ण रात्र विमानात काढावी लागली. विमानातील एका प्रवाशाला हृदयविकाराचा झटका

नागपूर : कोलकाता येथून मुंबईला जाणाऱ्या स्पाईसजेटच्या विमानातील प्रवाशांना तांत्रिक कारणांमुळे संपूर्ण रात्र विमानात काढावी लागली. विमानातील एका प्रवाशाला हृदयविकाराचा झटका आल्यामुळे विमान नागपूर विमानतळावर रविवारी रात्री ८.४५ वाजता आकस्मिक उतरवावे लागले होते. प्रवाशाला उपचारासाठी केअर हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. नियमानुसार विमान धावपट्टीवर उतरल्यानंतर उड्डाण भरण्यासाठी संबंधित कंपनीच्या अभियंत्यांकडून तांत्रिक तपासणी करून प्रमाणपत्र घेणे आवश्यक असते. ही बाब देशांतर्गत व्यावसायिक सेवा देणाऱ्या कंपन्यांसाठी बंधनकारक आहे. पण स्पाईसजेट कंपनीची विमान सेवा नागपुरात नसल्यामुळे कंपनीचे अभियंते नागपुरात उपलब्ध नव्हते. अभियंते दुसऱ्या विमानाने नागपुरात येईपर्यंत पहाट झाली. त्यांनी विमानाची संपूर्ण तपासणी केल्यानंतरच सकाळी ५.३०च्या सुमारास विमानाने मुंबईकडे उड्डाण भरल्याची माहिती मिहान इंडिया लिमिटेडचे वरिष्ठ संचालक अवधेश प्रसाद यांनी ‘लोकमत’ला दिली. स्पाईसजेटच्या विमानात १९० प्रवासी होते. रविवारी रात्री ७.४५ ते सोमवार सकाळी ५.३० वाजेपर्यंत अर्थात तब्बल ९ तास प्रवासी विमानात बसून होते. एअर इंडिया, इंडिगो, गो एअर आदी कंपन्यांची नागपूर विमानतळावर सेवा आहे. या कंपन्यांचे अभियंते नागपुरात आहेत. पण त्या कंपन्यांच्या अभियंत्यांची सेवा न घेता स्पाईसजेटच्या अभियंत्यांसाठी रात्रभर थांबावे लागले. तांत्रिक कारणामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. (प्रतिनिधी)