शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

कॉलेज कुमार बनून दारू विक्री, स्कूल बॅगमधून 190 बॉटल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2017 20:32 IST

विविध वेशभूषा करून अवैद्य देशी-विदेशी दारू विक्री केली जात आहे.

श्यामकुमार पुरे/ऑनलाइन लोकमतसिल्लोड, दि. 10 - तालुक्यात विविध वेशभूषा करून अवैद्य देशी-विदेशी दारू विक्री केली जात आहे. दारू विक्रीचा नवीन फंडा तालुक्यात सुरू आहे. कधी कॉलेज कुमार बनून तर कधी महाराज बनून दारू विक्री होत आहे.एका कॉलेज कुमारच्या(वेशातील) स्कूल बॅगमधून सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी 190 देशी दारूच्या बॉटल जप्त केल्याने खळबळ उडाली आहे.भराड़ी येथून बोरगाव बाजार येथे रोडने पेट्रोलिंग करीत असताना भराडी शिवारातील महादेव मंदिरासमोरून 2 कॉलेज कुमारच्या गणवेशात असलेली एक मोटारसायकल भरधाव वेगात संशयास्पद जाताना दिसल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर शिंदे यांनी मोटारसायकलवरील दोघांना थांबविले. त्यांना रात्रीचे वेळेस फिरण्याचे कारण विचारले असता त्यांनी सांगितले की, आम्ही सिल्लोड येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करतो. सिल्लोडवरून पिशोर येथे घरी जात आहोत.त्याना त्याचे नाव आणि गावबाबत विचारले असता, त्यांनी त्यांचे नाव 1) बाबू रामराव मोकासे आणि 2) पुंडलिक किसन मोकासे रा. शेफेपूर पिशोर ता. कन्नड़ असे सांगितले. त्यांच्याकडील कॉलेज बॅगची पाहणी केली असता त्यांचे बॅगमध्ये 190 देशी दारू संजीवनी संत्रा कागदी लेबल असलेल्या सीलबंद बाटल्या मिळून आल्या. अवैधरीत्या विनापरवाना दारू विक्रीसाठी असे फंडे सुरू झाले आहे. ही दारू भराड़ी येथील सरकारी देशी दारूचे दुकानातून आणल्याचे या दोघांनी सांगितले.त्यांचे ताब्यातून 190 देशी दारू संजीवनी संत्रा कागदी लेबल असलेल्या सीलबंद 12,350/- रु. चे बाटल्या आणि 30,000/- रु. ची मोटारसायकल असा एकूण 42,350/- रु.चा मुद्देमाल मिळून आल्याने पो. काँ. भिकन सतुके यांचे फिर्यादवरून पो. स्टे. सिल्लोड ग्रा येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, स. पो. नि. शंकर शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पो.हे.काँ. विठ्ठल चव्हाण हे करीत आहे.शासन मान्य दुकानातून अवैध विक्री...वरील आरोपी यांच्या ताब्यातील मिळून आलेला मुद्देमाल हा भराड़ी येथील शासन मान्य देशी दारूचे दुकानातून घेतला होता. भराड़ी येथील शासन मान्य देशी दारूच्या दुकानाचे मालक हे त्यांना शासन मान्य देशी दारूचे दुकानाचे परवान्यातील अटी व शर्तीचे उल्लंघन करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर दुकानाविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फ़त योग्य ती कारवाई करण्याबाबत पत्र व्यवहार करीत आहोत. - निरीक्षक शंकर शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिल्लोड ग्रामीण.33 दारू अड्यांवर छापे...सिल्लोड ग्रामीण पो.स्टे.च्या हद्दीत मागील आठवड्यात अवैद्य दारू विक्री वाहतूक करणाऱ्या एकूण 35 लोकांच्या दारु अड्यावर छापे टाकून पोलिसांनी 845 बाटल्या एकूण 49,050/- रु. चा मुद्देमाल जप्त केला. देशी दारू ची विक्री वाढली...सिल्लोड तालुक्यातील बहुतेक बार न्यायाल याच्या च्या आदेशाने बंद झाले.अख्या तालुक्यात केवळ 3 बार सुरु आहे. बार वरची गर्दी व सहज न मिळणारी विदेशी यामुळे काही तळीरामानी आपली लत विदेशी अयवजी देशी वर भागवने सुरु केल्याने व सहज देशी कुठे ही मिळत असल्याने देशी दारू ची मागणी वाढली आहे. परवाना धारक देशी दूकानदारांचा हा गोरख धंदा बंद करावा अशी मागणी होत आहे.यांनी केली कार्यवाही...पोलीस अधीक्षक आरती सिंह, उप विभागीय पोलीस अधिकारी बाजीराव मोहिते यांचे मार्गदर्शना खाली उपविभाग सिल्लोड हदी मध्ये सपोनी शंकर शिंदे, पो.कॉ. भिकन सतुके पो.हे.कॉ. विठ्ठल चव्हाण यांनी केली.एका कॉलेज कुमारच्या ( वेशातील) स्कूल बॅगमधून सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी 190 देशी दारुच्या बॉटल जप्त केल्या. आरोपी सहित सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शंकर शिंदे, पो.कॉ. भिकन सतुके पो.हे.कॉ. विठ्ठल चव्हाण दिसत आहे.