शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

१८६ न्यायालयांत व्हिडीओ कॉन्फरन्स सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2017 00:49 IST

कैदी किंवा आरोपी यांना न्यायालयात आणण्याचा खर्च व त्रास वाचावा व न्यायालयाचे कामकाज जलदगतीने व्हावे यासाठी येत्या सहा महिन्यांत राज्यातील १८६

मुंबई: कैदी किंवा आरोपी यांना न्यायालयात आणण्याचा खर्च व त्रास वाचावा व न्यायालयाचे कामकाज जलदगतीने व्हावे यासाठी येत्या सहा महिन्यांत राज्यातील १८६ न्यायालयांत व्हिडीओ कॉन्फरन्सची सुविधा उपलब्ध करण्यात येईल, अशी माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयाला बुधवारी दिली.पोलिसांचे एस्कॉर्ट पथक उपलब्ध नसले की काही आरोपींना न्यायालयात आणण्यात येत नाही. आरोपी अनुपस्थित राहिल्यास कधीकधी न्यायालयाचे कामकाजही चालत नाही. परिणामी खटला चालवण्यास विलंब होतो. पोलिसांकडेही पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने आरोपींची ने-आण करण्यासाठी पोलीस कमी पडत आहेत.खटल्यावरील सुनावणीस न्यायालयात हजर करण्यात येत नसल्याबद्दल येरवड्यातील एका कैद्याने उच्च न्यायालयाला पत्र लिहीले. या पत्राची दखल घेत उच्च न्यायालयाने याचिका दाखल करून घेतली. या याचिकेवर बुधवारी सुनावणी होती. (प्रतिनिधी)सहा महिन्यांत सुविधाया सर्व समस्यांवर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने येत्या सहा महिन्यांत राज्यभरातील १८६ न्यायालयांत व्हिडीओ कॉन्फरन्सची सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ४. ४५ कोटी रुपयांची तरतुदही केली आहे, अशी माहिती सरकारी वकिलांनी न्या. व्ही. एम. कानडे व न्या. सी.व्ही. भडंग यांच्या खंडपीठाला दिली.