शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

१८० कोेटी लीटर पाण्याची बचत

By admin | Updated: April 3, 2016 03:51 IST

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने पाण्याची बचत करण्यात महाराष्ट्रात आघाडी मिळविली असून, पाण्याचा पुनर्वापर करून २००३ ते २०१६ या कालावधीत १८० कोटी लीटर पाण्याची म्हणजे जवळपास

- दयानंद पाईकराव,  नागपूरमध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने पाण्याची बचत करण्यात महाराष्ट्रात आघाडी मिळविली असून, पाण्याचा पुनर्वापर करून २००३ ते २०१६ या कालावधीत १८० कोटी लीटर पाण्याची म्हणजे जवळपास ३.५० कोटी रुपयांची बचत केली आहे. रेल्वेच्या इतर विभागात, तसेच एसटी महामंडळ आणि खासगी उद्योगात असाच पाण्याचा पुनर्वापर केल्यास महाराष्ट्रातील जलसंकट दूर होण्यास मदत होऊ शकेल.रेल्वे विभागात गाड्या-प्लॅटफॉर्म धुणे, रेल्वे रुळाची स्वच्छता यासाठी दररोज हजारो लीटर पाण्याची नासाडी होते, परंतु मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने पाण्याचे महत्त्व ओळखून नागपूर विभागात नाल्यातून वाहणाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करून त्याचा २००३ मध्ये पुनर्वापर सुरू केला. त्यासाठी २८.४८ लाखांचा प्रकल्प नागपुरात उभारला. त्यात दररोज ६ लाख लीटर पाण्याचे शुद्धिकरण करण्याची क्षमता आहे. सध्या मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात ४ लाख लीटर पाण्याचे म्हणजे महिन्याकाठी १.२० कोटी लीटर पाण्याचे शुद्धिकरण होते.२००३ - २०१६ या कालावधीत मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने जवळपास १८० कोटी लीटरच्या पाण्याचे शुद्धिकरण करून त्याचा पुनर्वापर केला. रेल्वेने एवढे पाणी महापालिकेकडून विकत घेतले असते, तर त्यांना तब्बल ३.५० कोटी रुपये मोजावे लागले असते.सध्या महाराष्ट्रात पाण्याची भीषण टंचाई पाहता, अशा प्रकारे पाण्याचा पुनर्वापर केल्याने एक प्रकारे पाण्याची बचतच होत आहे. आम्ही आणखी अशाच प्रकारचे जलशुद्धिकरण केंद्र बल्लारशा येथे सुरू करणार आहोत. या प्रकल्पाची क्षमता सहा लाख लीटर प्रतिदिन राहणार आहे. या शिवाय नागपुरातील प्रकल्पाची क्षमता एक लाख लीटरने वाढविण्याचा विचार सुरू आहे.- प्रवीण पाटील, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे नागपूर विभाग