शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

विठुरायाच्या दर्शनासाठी १८0 बसेसचे नियोजन

By admin | Updated: June 16, 2014 22:12 IST

शेतकरी कष्टकर्‍यांचे दैवत पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनासाठी जाणार्‍या भाविकांच्या सुविधेसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अकोला विभागातून १८0 जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.

अकोला : शेतकरी कष्टकर्‍यांचे दैवत पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनासाठी जाणार्‍या भाविकांच्या सुविधेसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अकोला विभागातून १८0 जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. गतवर्षी १५0 जादा बसेस पंढरीच्या वारीसाठी सोडण्यात आल्या होत्या; मात्र प्रवाशांच्या तुलनेत या बसेस अत्यंत कमी पडल्याने यावर्षी अकोला विभागासाठी १८0 बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी विदर्भातील भाविक मोठय़ा संख्येने जातात. पायदळ दिंड्यांची यामध्ये मोठी संख्या आहे. मोठय़ा संस्थानमधून पायदळ दिंड्या आषाढी एकादशीच्या एक महिन्यापूर्वीच रवाना झाल्या असून, आता एकादशीपूर्वी एसटी बसेस व रेल्वेच्या अतिरिक्त गाड्यांचे नियोजन करण्यात येत आहे. यामध्ये रेल्वे आणि एसटी बसेसने जाणार्‍या भाविकांचीही मोठी संख्या असून, त्या प्रमाणात अतिरिक्त बसेसचे नियोजन करण्यात येत आहे. राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने अकोला विभागासाठी १८0 जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये अकोला विभागातील सर्वच आगारांचा समावेश असून,आषाढी एकादशीच्या आठ दिवसापूर्वीपासून या विशेष एसटी बसेस आगार क्रमांक दोनमधून सोडण्यात येणार आहे. त्यानंतर पंढरपूरवरून परत येण्यासाठी आषाढी एकादशीनंतर विशेष अतिरिक्त एसटी बसेस सोडण्यात येणार आहेत. अकोला विभागातील विविध आगारातून या १८0 एसटी बसेस सोडण्यात येणार असून, यामध्ये वाशिम, मंगरुळपीर, मालेगाव, मानोरा, आकोट, कारंजा, तेल्हारा, रिसोड, मूर्तिजापूर, पातूर, बाळापूर आगारांचा समावेश आहे. पंढरपूरला जाणार्‍या भाविकांची गर्दी लक्षात घेता राज्य परिवहन महामंडळाने १८0 जादा बसेसचे नियोजन केले असून, या बसेस केव्हापासून धावणार तसेच कुठल्या आगाराला किती बसेस देण्यात येणार, याबाबतचे नियोजन सुरू करण्यात आले आहे.