शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
3
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
4
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
5
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
6
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
7
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
8
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
9
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
10
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

१८ हजार बाप्पांची होणार प्रतिष्ठापना

By admin | Updated: September 5, 2016 03:00 IST

बाप्पाच्या दहा दिवसांच्या मंगल पर्वाचा प्रारंभ झाला असून रविवारी हरितालिकेच्या दिवशी सायंकाळच्या शुभ मुहूर्तावर घरोघरी वाजतगाजत श्री गणरायाचे आगमन झाले.

पेण : बाप्पाच्या दहा दिवसांच्या मंगल पर्वाचा प्रारंभ झाला असून रविवारी हरितालिकेच्या दिवशी सायंकाळच्या शुभ मुहूर्तावर घरोघरी वाजतगाजत श्री गणरायाचे आगमन झाले. गणेशभक्त गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणा देत आपल्या लाडक्या बाप्पाला घरी घेऊन जाताना दिसत होते. यावेळी आबालवृद्धांचा आनंद ओसंडून वाहत होता. सोमवारी पेणमध्ये तब्बल १८ हजार बाप्पांची विधिवत प्राणप्रतिष्ठापना होणार आहे.पेण नगरीही साक्षात श्रीगणेशाच्या निर्मात्याची नगरी असल्याने बाहेरून तसेच स्थानिक गणेशभक्तांंमध्ये उत्साही वातावरण होते. दिवसभर पेणच्या रस्त्यावर गर्दी पहावयास मिळत होती. पेण शहरात शनिवारी रात्रीपासून दूरवरचे बाप्पा आपापल्या इच्छीतस्थळी रविवारी रवाना झाले. सकाळी ७.०० वाजल्यासून कार्यशाळांमध्ये गर्दी उसळली. पेण शहर व परिसरातील खाजगी गणराय चतुर्थीच्या एक दिवस अगोदरच आपल्या घरची गणेशमूर्ती मखरामध्ये विराजमान करण्याची प्रथा आहे. रविवारी हरितालिका असल्याने आणि सोमवारी बाप्पा विराजमान होणार असल्याने बाजारातही मोठ्या प्रमाणावर गर्दी पहावयास मिळाली. पेण परिसरात ही सर्वत्र प्रथा असून अतिथी देवो भव या रुपात श्री गणरायाची एक दिवस अगोदरच अतिथी प्राणप्रतिष्ठापना केली जाते. यामुळे घराघरात चैतन्याचे वातावरण होते. श्रींच्या आगमनानंतर सर्वत्र स्वच्छता, धूप, दीप, नैवेद्य, आरती, मोदकासहित फळे व मिठाईचा प्रसाद, सुगंधी अत्तर, सुगंधी सुवासाच्या अगरबत्त्या, समई व विजेची आरास करण्यात आली होती. पेण शहरात सार्वजनिक १४ तर खाजगी १५०० गणेशमूर्ती, वडखळ परिसरात ६ हजार, दादर सागरी पोलीस हद्दीत ६ हजार अशा एकूण १८ हजार गणेशमूर्ती पेण शहर व ग्रामीण परिसरात १७३ गावांमध्ये विराजमान होणार आहेत. बाप्पाच्या दहा दिवसांच्या मेगा इवेंटसाठी प्रशासन सज्ज झाले असून पोलीस सुरक्षा यंत्रणेचा चोख बंदोबस्त आहे. राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडीचे विघ्न दूर झाले असून गणेशभक्तांना गणराय सुखरूपपणे घरी नेता आले. (वार्ताहर)>गणेशमूर्तींच्या किमतीत वाढतळा : तालुक्यात गेली अनेक वर्षे गणेशमूर्तींचे कारखाने कार्यरत आहेत. पूर्वी या कारखान्यातून शाडूचे गणपती बनविले जात असत. परंतु हल्ली शाडूच्या किमतीत वाढ झाल्यामुळे बहुतांशी कारखानदार प्लास्टर आॅफ पॅरिसचे गणेशमूर्ती बनवितात. तरी देखील काही गणेशभक्तांच्या आग्रहाखातर शाडूच्या मूर्ती बनविल्यात आल्या आहेत.गणेश कला मंदिरातील गणेशमूर्तींना मागणी असल्याचे कें द्राचे मालक वसंत पोळेकर यांनी सांगितले. तालुक्यात जवळपास ८-९ गणेश कारखाने आहेत. या कारखान्यातून सुमारे २८०० ते २९०० गणेशमूर्ती तयार केल्या आहेत. गतवर्षीपेक्षा चालू वर्षी गणेशमूर्तीची मागणी वाढली असल्याचे पोळेकर यांनी सांगितले.गणेशमूर्ती तळा तालुक्यासह इंदापूर, माणगाव, महाड, म्हसळा येथे पाठविण्यात आल्या असल्याचे वसंत पोळेकर यांनी सांगितले. सात-आठ महिन्यांपासून हे काम सुरू असून कारागिरांची कमतरता, न परवडणारी मजुरी, रंगाचे वाढलेले भाव, शाडू मातीच्या दरात वाढ हे पाहता यावर्षी मूर्तींच्या किमती २० ते २५ टक्क्यांनी वाढवाव्या लागल्या आहेत.