शहरं
Join us  
Trending Stories
1
3BHK फ्लॅट 'काश्मिरी फळे' ठेवण्याच्या नावाखाली घेतला अन्...; डॉक्टर मुजम्मिलची स्फोटके लपवण्याची सगळी Inside Story
2
रिझवानचा मित्र परवेझला अटक, पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होता, भाऊ आहे सैन्यात
3
भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्याकडून मराठीची अवहेलना; महापालिकेच्या नियमाला हरताळ, काय घडलं?
4
या इलेक्ट्रीक स्पोर्ट्स कारचे भारतीय दिवाने...! अब्जाधीशही करतायत ४-५ महिन्यांची वेटिंग, लाँच झाल्यापासून...
5
आयपीओंमुळे गुंतवणूकदार मालामाल; ६६ टक्के कंपन्यांनी लिस्टिंगच्या दिवशी दिला दमदार नफा 
6
WPL Mega Auction 2026 : नीता अंबानी थेट हरमनप्रीतसह पोहचल्या शॉपिंगला; असं पहिल्यांदाच घडलं (VIDEO)
7
कोण आहेत पवन नंदा आणि सौम्या सिंह राठौर? WinZO च्या संस्थापकांना अटक, कारण काय?
8
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
9
“लाडक्या बहिणींची गर्दी म्हणजे शिवसेनेचा विजय निश्चित, धनुष्यबाणाला मतदान करा”: एकनाथ शिंदे
10
Nothing: परवडणाऱ्या किंमतीत प्रीमियम स्मार्टफोन, नथिंग फोन (३ए) लाईट भारतात लॉन्च!
11
"शहाणं समजू नका, दमदाटीचा फुगा कधीतरी फुटतोच"; अनगरातील संघर्षानंतर उज्ज्वला थिटेंच्या पाठीशी अजित पवार
12
काँग्रेसचे अनेक सोशल मीडिया अकाउंट परदेशातून चालवले जातात; संबित पात्रांचा गंभीर आरोप
13
दत्त जयंती २०२५: गुरुलीलामृत ग्रंथ पठण करा, स्वामी सदैव साथ देतील; पाहा, कसे करावे पारायण?
14
Video - "मी आपलं भविष्य...", सरकारी शाळेतील शिक्षिकेची बेरोजगार तरुणांना लग्नाची ऑफर
15
वर्ष संपता संपता २०२५ साठीची बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरली; अशी घटना घडली की, ठरली 'असाधारण घटनां'पैकी एक
16
टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव झाल्यानंतरही सौरव गांगुलीला 'या' गोष्टीचा आनंद, म्हणाला...
17
Mumbai Fraud: मुंबईतील ७२ वर्षीय उद्योजकासोबत ३५ कोटींचा 'शेअर' घोटाळा; कसे लुटले कळूही दिलं नाही
18
दोषमुक्त पंचक २०२५: ५ दिवस अशुभ-अमंगल, ‘ही’ कामे करणे टाळा; कधी संपणार प्रतिकूल काळ?
19
जमीन घोटाळ्याप्रकरणी बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीनांना २१ वर्षांची शिक्षा! मुलगा-मुलीलाही प्रत्येकी ५ वर्षांचा तुरुंगवास
20
सोन्याच्या दरात घसरण, चांदी मात्र सुस्साट... एकाच झटक्यात २७५८ रुपयांची तेजी, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात १८ टँकरने पाणीपुरवठा

By admin | Updated: May 12, 2015 01:57 IST

जिल्ह्यातील महापालिका क्षेत्रामध्ये होत असलेल्या पाणीकपातीमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे, तर ग्रामीण भागातही सुमारे १०४ गावपाडे तीव्र पाणीटंचाईला तोंड

ठाणे : जिल्ह्यातील महापालिका क्षेत्रामध्ये होत असलेल्या पाणीकपातीमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे, तर ग्रामीण भागातही सुमारे १०४ गावपाडे तीव्र पाणीटंचाईला तोंड देत असून त्यांना १८ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. पाण्याच्या टंचाईचा हा अहवाल पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या पाणीटंचाई आढावा बैठकीत प्रशासनातर्फे मांडण्यात आला.नियोजन भवनमध्ये पार पडलेल्या या बैठकीला आमदार, खासदारांसह ठाणे जिल्हाधिकारी अश्विनी जोशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय चौधरी, अतिरिक्त सीईओ रवींद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी प्रमोद बोरसे आदींसह महापालिकांचे प्रतिनिधी, विभागप्रमुख या वेळी उपस्थित होते. महापालिकांसह ग्रामीण व दुर्गम भागातील टंचाईसंदर्भात या वेळी आढावा घेण्यात आला. पाणीसमस्या तत्काळ दूर करण्यासाठी अधिकाऱ्यांनी जोरदार प्रयत्न करण्याची गरज आहे. धरणांच्या जिल्ह्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून आगामी बैठकीमध्ये टंचाई कमी झाल्याचा अहवाल मिळणे अपेक्षित असल्याचे पालकमंत्र्यांनी या वेळी अधिकाऱ्यांना सांगितले.धरणातील पाणीसाठा टिकवून ठेवण्यासाठी महानगरपालिका क्षेत्रामध्ये होणाऱ्या पाणीपुरवठ्यात आधीच कपात सुरू करण्यात आली आहे. पण, या कपातीच्या नावाखाली बहुतांशी ठिकाणी २४ तासांच्या पाणीकपातीच्या समस्येला नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी मंत्रालयात लवकरच बैठक घेण्यात येणार असल्याचे पालकमंत्र्यांनी या बैठकीत सांगितले. यासाठी महापालिकांसह पाणीपुरवठा करणाऱ्या एमआयडीसी, जलसंपदा विभागप्रमुखांना उपस्थित राहण्याचे आदेश या वेळी त्यांनी दिले.बैठकीत उल्हासनगरातील २४ तासांची पाणीकपात १२ तासांवर आणण्याकरिता चर्चा झाली. भिवंडी शहरातील पाणीगळती, होणारा टँकरचा पाणीपुरवठा विकासकांसह डाइंग प्रोसेसिंग कारखान्यांना होत असल्याच्या मुद्यावरही या वेळी चर्चा झाली. मीरा-भार्इंदर महापालिकेला वाढीव पाणीपुरवठा केल्याशिवाय पाणीसमस्या दूर होणार नाही. अंबरनाथ, बदलापूर शहरांसाठी सहा महिन्यांत वाढीव पाणीपुरवठा होणार आहे. तसेच २४ एमएलडी वाढीव पाणीपुरवठ्याचे काम पूर्णत्वाकडे असून पाच एमएलडीचे काम आधीच पूर्ण करण्यात आल्याची माहिती या वेळी देण्यात आली. (प्रतिनिधी)