शहरं
Join us  
Trending Stories
1
‘हा तर मणिपूरच्या लोकांचा अपमान आहे’, PM मोदींच्या दौऱ्यावर काँग्रेसची बोचरी टीका
2
'बीडमध्ये पोलिसांना आपले आडनाव लावता येत नसेल तर...', धनंजय मुंडेंनी व्यक्त केली खंत
3
संसदेच्या आवारात भाजपची दोन दिवसांची कार्यशाळा; PM मोदी शेवटच्या रांगेत बसले...
4
विसर्जनाचं कंत्राट गुजरातला दिलं, कोळी बांधवांचा लालबाग मंडळावर गंभीर आरोप
5
'...तरच गाझा युद्ध थांबेल'; शांतता चर्चेत नवा ट्विस्ट, इस्त्रायलच्या परराष्ट्र मंत्र्यांचे मोठे विधान!
6
जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा राजीनामा देण्याच्या तयारीत! का घेतला मोठा निर्णय?
7
एडटेक कंपनी 'फिजिक्स वाला'चा ३८२० कोटींचा आयपीओ; सेबीकडे दस्तऐवज दाखल, कुठे करणार गुंतवणूक?
8
कॅन्सरचे रुग्ण बरे होणार? रशियाच्या लसीने सर्व अडथळे पार केले; एका मंजुरीनंतर रुग्णांना मिळणार
9
Tanya Mittal : एका रात्रीत सर्व सोनं, ३ आयफोन विकायची आली वेळ; तान्या मित्तलचा मोठा खुलासा, म्हणाली...
10
लाल समुद्रात इंटरनेटची केबल तुटली; भारत-पाकिस्तानसह आशियातील अनेक देशांना फटका
11
टिंडरवरच्या मैत्रिणीला भेटायला गेला अन् तरुणासोबत मोठा गेम झाला! पोस्ट लिहीत म्हणाला...
12
पितृपक्ष २०२५: १५ दिवस स्वामी सेवेने पितृदोष मुक्तता; १ मंत्र रामबाण, दत्तगुरु कल्याण करतील
13
आज रात्री किती वाजता दिसणार चंद्रग्रहण, कधी असेल ग्रहणाचा स्पर्श, मध्य आणि मोक्षकाळ, जाणून घ्या  
14
रात्री Wifi बंद करायला हवं का? ९९% लोकांना माहित नाहीत फायदे, समजल्यावर तुम्हीही...
15
मिनेसोटात हेलिकॉप्टरचा भीषण अपघात, एअरपोर्टजवळ 'आर६६' हेलिकॉप्टर जळून खाक; प्रवाशांचा मृत्यू
16
पितृपक्ष संकष्ट चतुर्थी २०२५: मृत्यू पंचकाचे विघ्न दूर होणार, गणपती शुभ करणार; ५ गोष्टी करा!
17
"पुढच्या वर्षी सुनेला घेऊनच विसर्जनाला येणार...", लेकाच्या लग्नाला आदेश बांदेकरांचा ग्रीन सिग्नल
18
सोने खरेदीचा विचार करताय? थांबा! सोन्याने गाठला नवीन उच्चांक, आठवड्यात ३,९०० रुपयांची वाढ
19
खग्रास चंद्रग्रहण २०२५: गर्भवती महिलांनी ग्रहण पाहणे अशुभ असते का? पाहा, नियम अन् मान्यता
20
पर्थमध्ये पारंपरिक उत्साहात साजरा झाला गणोशोत्सव; मराठी संस्कृतीचे जतन, एकरुपतेचे होते यथार्थ दर्शन

१८ महापालिकांमध्ये टीडीआर दुप्पट करणार

By admin | Updated: January 29, 2016 02:06 IST

राज्यातील १८ महापालिकांच्या हद्दीत शासन वा स्थानिक स्वराज्य संस्थांनी केलेल्या भूसंपादनावर विकास हक्क हस्तांतरण म्हणजे टीडीआर दुप्पट करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे.

- यदु जोशी, मुंबईराज्यातील १८ महापालिकांच्या हद्दीत शासन वा स्थानिक स्वराज्य संस्थांनी केलेल्या भूसंपादनावर विकास हक्क हस्तांतरण म्हणजे टीडीआर दुप्पट करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. केंद्र सरकारच्या भू-संपादन कायद्याने संपादित जमिनीचा मोबदला सध्या बाजार दरापेक्षा दुप्पट मिळू लागला आहे. जमिनीचा दुप्पट दर आणि अन्य काही पॅकेज मिळू लागल्यानंतर टीडीआर घेण्याकडे कलच उरला नाही. त्यामुळे सरकारने आता टीडीआर दुप्पट करण्याचा निर्णय घेतला असून टीडीआरसह आकर्षक तरतुदी असलेल्या धोरणाची अधिसूचना नगरविकास विभागाचे अवर सचिव संजय सावजी यांनी गुरुवारी जारी केली. नवीन धोरणानुसार दाट वस्तीच्या ठिकाणी संपादित जमिनीच्या तिप्पट तर विरळ वस्तीच्या ठिकाणी दुप्पट टीडीआर देण्यात येणार आहे. राज्य शासन वा स्थानिक स्वराज्य संस्था वा प्राधिकरणाला सार्वजनिक उपयोगाची इमारत जसे शाळा, आरोग्य केंद्र, वाचनालय आदी एखाद्याने बांधून दिले तर त्याला त्या मोबदल्यात टीडीआर देण्याची तरतूदही नवीन धोरणात करण्यात आली आहे. टीडीआर म्हणजे काय?खासगी मालकीची जमीन शासनाने संपादित केल्यानंतर त्याचा पैशांच्या स्वरुपात मोबदला न देता चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) दिल्यास त्याला विकास हक्क हस्तांतरण (टीडीआर) असे म्हणतात. मिळालेला एफएसआय तुम्हाला त्याच शहरात अन्यत्र वापरून जादाचे बांधकाम नियमानुसार करता येते. अतिरिक्त टीडीआर मिळाल्याने बांधकाम क्षेत्राला चालना मिळेल. परिणामी, घरांच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. 18महापालिकांमध्ये हे धोरण लागू करण्यात आले आहे. नागपूर, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, सांगली-मिरज-कुपवाड, चंद्रपूर, नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, मालेगाव, औरंगाबाद, नांदेड-वाघाळा, लातूर, परभणी, अमरावती, अकोलामुंबई, ठाण्यात लवकरच : मुंबई आणि ठाण्यासह त्या जिल्ह्णातील सर्व महापालिकांमध्ये टीडीआर धोरण याच धर्तीवर लवकरच लागू करण्यात येणार असल्याचे नगरविकास विभागाच्या सूत्रांनी सांगितले. भूखंडांचे स्वरुपअसा मिळेल टीडीआर (भूखंड क्षेत्रफळ चौरस मीटरमध्ये)१००० चौ.मी.१००० ते४००० चौ.मीपर्यंत४००० चौ.मी.व त्यापेक्षा अधिक१)९ मीटरपेक्षा अधिक पण १२ मीटरपेक्षा कमी0.200.400.30रुंदीच्या रस्त्यालगत असलेला भूखंड२)१२ मीटरपेक्षा अधिक पण १८ मीटरपेक्षा कमी0.300.500.65रुंदीच्या रस्त्यांलगत असलेला भूखंड३)१८ मीटरपेक्षा अधिक पण २४ मीटरपेक्षा कमी 0.300.600.90रुंदीच्या रस्त्यालगत असलेला भूखंड४)२४ मीटरपेक्षा अधिक पण ३० मीटरपो कमी 0.300.801.15रुंदीच्या रस्त्यालगत असलेला भूखंड५)३० मीटरपेक्षा अधिक रुंदीच्या0.301.001.40रस्त्यालगत असलेला भूखंड