शहरं
Join us  
Trending Stories
1
एलओसीवर ८-९ मेची रात्र! भारताने एवढे बॉम्ब फोडले की, पाकिस्तानी चौकीवर सकाळी पांढरे निशाण फडकले
2
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के; पाकिस्तान सीमेजवळही धक्के जाणवले
3
संजय राऊतांनी लिहिलेले 'नरकातला स्वर्ग' पुस्तक वसंत मोरेंनी देवाऱ्यात ठेवलं, कारण...
4
IPL 2025: १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला दाढी-मिशी? व्हायरल झालेल्या फोटोमागचं सत्य काय?
5
"मी उपलब्ध नाही...", पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यास युसूफ पठाण जाणार नाही, संसदीय शिष्टमंडळाला नकार
6
भयंकर! सुनेने रील बनवताच सासरच्या मंडळींना राग अनावर; संतापलेल्या सासऱ्याने फोडलं डोकं
7
मराठी गायकाने नाकारली तुर्कीतील कॉन्सर्टची ऑफर; म्हणाला, "५० लाख देत होते पण..."
8
गुंतवणूकदारांसाठी लॉटरी! ५ वर्षात 'या' शेअरने दिला ४.९९ कोटी रुपये परतावा; अजूनही गुंतवणुकीची संधी?
9
ज्योतीची साथीदार, एकत्रच करत होत्या पाकिस्तान वाऱ्या; कोण आहे प्रियंका सेनापती?
10
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल! स्वस्त झाले की महागले? जाणून घ्या आजचे दर
11
Amit Thackeray: "युद्धाचा निकाल स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळावा"; अमित ठाकरेंचं थेट पंतप्रधान मोदींना पत्र
12
पाकचा नापाक इरादा भारताला आधीच लक्षात आला, सुवर्ण मंदिरावरील हल्ला 'अशा' प्रकारे उधळून लावला!
13
EPFO चा धमाका! तुमच्या PF आणि पेन्शनमध्ये मोठे बदल, जाणून घ्या ५ महत्त्वाचे अपडेट्स
14
स्वतंत्र झाल्यावर कसा असेल बलुचिस्तान देश? जाणून घ्या
15
पाकिस्तानचा मंत्री अध्यक्ष असलेल्या आशिया कपमध्ये भारतीय संघ खेळणार नाही; नाव माघारी घेतले... 
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्रावर भडकली टीव्ही अभिनेत्री, म्हणाली- "अशा लोकांना..."
17
'ठरलं तर मग' मालिकेत पुन्हा येतेय 'ही' अभिनेत्री, लेकीच्या जन्मानंतर दोन महिन्यात कमबॅक
18
Jyoti Mlhotra : "माझ्या मुलीला फसवलं जातंय, ती पाकिस्तानला..."; ज्योती मल्होत्राच्या वडिलांचा खळबळजनक दावा
19
"माझ्या ११ वर्षांच्या मुलाचं निधन झालं अन् मी देव्हाऱ्यातील मूर्ती काढल्या", अभिनेत्याचा मोठा खुलासा
20
'सितारे जमीन पर' थिएटरमधून थेट युट्यूबवर होणार प्रदर्शित, आमिर खान आणणार PPV मॉडेल

बालगृहांचे १,८०० कोटी शासनाकडे पडून

By admin | Updated: January 29, 2015 05:46 IST

आघाडी सरकारच्या अखरेच्या अर्थसंकल्पात महिला व बालकल्याण विभागातील विविध योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी सुमारे तीन हजार कोटींवर तरतूद केली होती़

स्रेहा मोरे, मुंबईआघाडी सरकारच्या अखरेच्या अर्थसंकल्पात महिला व बालकल्याण विभागातील विविध योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी सुमारे तीन हजार कोटींवर तरतूद केली होती़ त्या तरतुदीतून जानेवारी २०१५ अखेर तब्बल १,८०८ कोटी विभागाकडे खर्च करण्यासाठी शिल्लक असताना अनाथ बालकांच्या परिपोषण अनुदानासाठी महिला-बालकल्याण विभाग आखडता हात घेत असल्याचे उघड झाले आहे. आता नव्या मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडून ठोस निर्णयाची बालगृहांना आशा आहे. २०१४-१५च्या अर्थसंकल्पात महिला व बालकल्याण विभागासाठी ३,३७८. ३८९ कोटींची तरतूद केलेली असताना या विभागाने जानेवारी २०१५ अखेर केवळ १,५६९.६१० कोटी म्हणजे अवघे ४६.४६० टक्केच खर्च केल्याने आजमितीस विभागाकडे तब्बल १,८०८.७७९ कोटी अर्थात ५३.५४ टक्के निधी पडून आहे. राज्यातील सुमारे हजारांवर बालगृहांचे दोन वर्षांपासूनचे १०८ कोटी आणि चालू वर्षाचे अंदाजे ७० ते ८० कोटी रुपये अनुदान प्रलंबित आहे. अशा एकूण १७८ ते १८८ कोटी रुपयांची व्यवस्था विभागाच्या एकूण तरतुदीतून शिल्लक असलेल्या पैशांतून करता येणे सहज शक्य आहे. मात्र विभागाची अनास्थाच अनाथ बालकांच्या आणि पर्यायाने त्यांना सांभाळणाऱ्या या स्वयंसेवी संस्थांच्या मुळावर उठली आहे. शासनाने २००६ मध्ये शासन निर्णय पारित केला़ त्यात १०० मुलांच्या एका बालगृहासाठी ११ कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध मंजूर केला़ मात्र या शासन निर्णयात या ११ कर्मचाऱ्यांना वेतनाची तरतूद दर्शवली नाही. उलटपक्षी मुलांच्या परिपोषण अनुदानातूनच कर्मचारी मानधन व्यवस्था करावी, असा उल्लेख आहे.अर्थसंकल्पात बालगृहांसाठी पूर्ण तरतूद असावी, वाढीव अनुदानाच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी व्हावी, यासाठी औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल करून दाद मागितली आहे, असे लातूरचे बालगृहचालक आणि याचिकाकर्ते शिवाजी जोशी यांनी सांगितले.