शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
2
Radhika Yadav : "इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर
3
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल
4
मोठी बातमी! कोट्यवधींचे महाघोटाळे, बोगस भरतीही; शनि शिंगणापूर मंदिर ट्रस्ट बरखास्त
5
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
6
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
7
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
8
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी
9
कुजबुज! उपमुख्यमंत्र्यांच्या कपाटात दडलं काय?; आमदारांचे PA, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले
10
कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
11
मतदार याद्यातील घोळ, घुसखोरी आणि गोंधळ; घोळ निस्तरणे निवडणूक आयोगाला शक्य होत नाही
12
...तर गो बॅक टू द थर्ड वर्ल्ड; न्यू यॉर्कमध्ये हाताने बिर्याणी खाल्ली, काय बिघडले?
13
फास्टॅग नीट न लावल्यास चालक ब्लॅकलिस्टमध्ये; तुम्हीही वाहन चालवताना करता का 'ही' चूक?
14
Video : शिवाजीनगर येथे पीएमटी बसला आग;नागरिकांच्या तत्परतेने टळली जीवितहानी
15
Wimbledon 2025: अल्काराझनं सलग तिसऱ्यांदा गाठली फायनल! नदालनंतर अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा
16
दोन भिन्न वंशावळी न्यायालयात का सादर केल्या गेल्या? सात्यकी सावरकर यांनी याचा खुलासा करावा
17
नवऱ्याने रागाच्या भरात बायकोच्या नाकाचा घेतला चावा, झाले दोन तुकडे... नेमकं घडलं तरी काय?
18
"जनसुरक्षा विधेयका'चं नाव 'भाजप सुरक्षा विधेयक' करायला हवं"; मिसा, टाडाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
19
Video: तुफान राडा ! आधी 'कॅप्टन' गिल पंचांशी भांडला, मग सिराजचाही पारा चढला, काय घडलं?
20
“नव्या कायद्याची गरज का? जनतेच्या मनातील संभ्रम...”; जनसुरक्षा विधेयकाला काँग्रेसचा विरोध

दोन अपघातांत १८ ठार

By admin | Updated: May 26, 2015 02:30 IST

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील तलासरी येथे सोमवारी पहाटे दोन बसच्या अपघातात ११ जण ठार तर इतर १० जण गंभीर जखमी झाले.

तलासरी (जि. पालघर) : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील तलासरी येथे सोमवारी पहाटे दोन बसच्या अपघातात ११ जण ठार तर इतर १० जण गंभीर जखमी झाले. सुरत येथील पटेल कुटुंबीय गुजरातला परतत असताना टेम्पो ट्रॅव्हलर चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात घडला.पटेल कुटुंबीय आपल्या नातेवाइकांना मुंबई एअरपोर्टवर सोडण्यासाठी आले होते. गुजरात येथे परत जात असताना महाराष्ट्राच्या हद्दीवरील आच्छाड येथे चालकाला डुलकी लागली. त्यामुळे त्याचा ताबा सुटून बस महामार्गावरील डिव्हायडर तोडून गुजरातहून मुंबईकडे येणाऱ्या लक्झरीवर आदळली. या अपघातात टेम्पो ट्रॅव्हरलमधील १० तर लक्झरीमधील १ असे ११ जण जागीच ठार झाले. जखमींना वापी व सिल्व्हासा तसेच तलासरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.अपघातातील मृतांची नावे :तुषार भरत पटेल (३२), अम्मी तुषार पटेल (३०), ध्येय तुषार पटेल (११), धवलभाई प्रवीणभाई पटेल (२८), भूमिका धवलभाई पटेल (२५), मनोहरभाई जेवेरभाई पटेल (४६), भूमी मणीशभाई महन्त (१८), डॅनिश प्रवीणभाई पटेल (३०), रिना डॅनिश पटेल (२७), जिया धवलभाई पटेल (५) आणि तुस्मानभाई व्होरा.बारामती (जि. पुणे) : बालाजीच्या दर्शनाला निघालेल्या स्कार्पिओचा कर्नूर ते चित्तुर (आंध्र प्रदेश)दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला. यात बारामतीच्या ७ युवकांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात सोमवारी पहाटे चालकाला डुलकी लागल्याने घडला.च्बारामतीहून सात युवक स्कार्पिओ गाडीतून रविवारी तिरुपतीला देवदर्शनासाठी निघाले होते. सोमवारी पहाटे अडीचच्या सुमारास आंध्र प्रदेशातील कर्नूर-चित्तुर महामार्गावर चांगलामारीनजीक चालकाला झोप लागल्याने गाडी रस्त्यालगतच्या घरावर जाऊन आदळली. त्यात पाच जण ठार झाले तर अन्य दोघे जखमी झाले.मृतांची नावे -शेखर बापूराव गवळी (२२), हृषीकेश पोपट गवळी (१७), अनिल सत्यवान गवळी (२५), सागर बाळासाहेब रसाळ (२०), सागर अंकुश रसाळ (२५), अजित रामचंद्र रसाळ (३१), नागेश बाळासाहेब खराडे (२१).