शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
5
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
6
Shefali Jariwali Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
7
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
8
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
9
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
10
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
11
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
12
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
13
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
14
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
15
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
16
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
17
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
18
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
19
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
20
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!

ट्रक-क्रुझर अपघातात 18 ठार

By admin | Updated: November 27, 2014 01:54 IST

ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात भरधाव ट्रकने क्रुझरला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात जीपमधील आठ जण ठार, तर एक गंभीर जखमी झाले आहेत़

अकोला/कुरुम : ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात भरधाव ट्रकने क्रुझरला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात जीपमधील आठ जण ठार, तर एक गंभीर जखमी झाले आहेत़ जखमींवर अमरावती येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ ही घटना मूर्तिजापूर तालुक्यातील महामार्गावरील मधापुरी फाटय़ाजवळ बुधवारी सकाळी 8 वाजता घडली़ 
माणिक नारायण पाटील (58), अरविंद माणिक पाटील (28), सचिन माणिक पाटील (30), प्रभाकर शेनू बोर्ले (68), वसंत महादेव पाटील (59), भास्कर निळखंड पाटील (65), प्रकाश रामचंद्र पाटील (60), भास्कर राम किंगे (55) अशी मृतांची नावे आहेत़ अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला असून, त्याच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आह़े  
मलकापुरातील तांदूळवाडी येथील माणिक नारायण पाटील यांच्या मुलगा अरविंद (28) याचा विवाह संबंध निश्चित करण्यासाठी पाटील कुटुंब अमरावतीच्या आर्वी येथे सकाळी निघाले होते. अमरावतीहून अकोलाकडे येणा:या भरधाव ट्रकने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात क्रुझरला धडक दिली. क्रुझरच्या कॅबीनचा चुराडा झाला. जीप 1क्क् फूट फेकली गेली.  यात 7 जण जागीच ठार झाले तर दोघे गंभीर जखमी झाले होते. उपवर अरविंद यांचा उपचारदारम्यान मृत्यू झाला. क्रुझरचालक शंकर अभिमन्यू पाटील हा गंभीर जखमी आहेत. (प्रतिनिधी)
 
ट्रक-ऑटो भीषण अपघातात 7 ठार
चापोली (जि. लातूर) : भरधाव ट्रकने ऑटोला दिलेल्या जोरदार धडकेने झालेल्या भीषण अपघातात सातजण ठार, तर एक महिला गंभीर जखमी झाली़ ही घटना लातूर जिलतील चाकूर तालुक्यातील चापोलीजवळ बुधवारी सकाळी 11 च्या सुमारास घडली़ अपघातात मृत्यूमुखी पडलेले पाचजण एकाच कुटुंबातील असून, उर्वरित दोघे त्याच कुटुंबातील मुलगी व जावई आहेत.  
मृतांमध्ये जब्बार मलंगसाब शेख (23, ऑटोचालक), एकबाल मलंगसाब शेख (35), मगदूम मलंगसाब शेख (4क्), नजमुनबी मलंगसाब शेख (6क्), खैरुनबी शेख (7क्), रिझवाना हसन पठाण (28), हसन पठाण यांचा समावेश आहे. 
खैरुनबी शेख यांना अर्धागवायू झाल्याने त्यांना चापोली येथून बुधवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ऑटोमधून देवणी येथील रुग्णालयात नेण्यात येत होत़े दरम्यान, लातूरहून - अहमदपूरकडे जाणा:या भरधाव ट्रकने ऑटोला जोरदार धडक दिली. यात जबार मलंगसाब शेख, एकबाल मलंगसाब शेख, खैरुनबी शेख आणि हसन पठाण हे जागीच ठार झाल़े तर जखमींना लातूरच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात येत असताना वाटेतच मगदूब शेख, नजमुनबी शेख, रिझवाना पठाण यांचाही मृत्यू झाला़ फरजाना शेख हिची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय अधिका:यांनी सांगितल़े रस्त्यातील खड्डा चुकविण्याचा प्रयत्न ट्रकचालकाने ऑटोला धडक दिल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितल़े   (प्रतिनिधी)  
 
लेकरांचे नशीब बलवत्तर
या अपघातात आजी, आई, तीन भाऊ, बहीण आणि भावजी अशा सात जणांचा मृत्यू झाला़ तर एका महिलेची प्रकृती चिंताजनक आह़े इरफान आणि समीर या मुलांना मार लागला असला तरी त्यांची प्रकृती चिंताजनक नसल्याचे वैद्यकीय अधिका:यांनी सांगितल़े