शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यातील १८ दिवस धोक्याचे

By admin | Updated: May 2, 2017 05:37 IST

या वर्षी पावसाळ्यातील १८ दिवस मुंबईकरांसाठी धोक्याचे ठरणार आहेत. महापालिकेच्या अनेक रखडलेल्या कामांमुळे पावसाळ्यात

मुंबई : या वर्षी पावसाळ्यातील १८ दिवस मुंबईकरांसाठी धोक्याचे ठरणार आहेत. महापालिकेच्या अनेक रखडलेल्या कामांमुळे पावसाळ्यात शहरात पाणी साचण्याची भीती असतानाच १८ दिवस मोठ्या भरतीचे आहेत. त्यामुळे या काळात शहरात मोठ्या प्रमाणात पाणी साचणार नाही याची खबरदारी घेण्याचे आव्हान महापालिका प्रशासनासमोर असणार आहे.ब्रिमस्टोवॅड प्रकल्पांतर्गत मुंबईतील पर्जन्य जलवाहिन्यांची पावसाचे पाणी वाहून नेण्याची क्षमता वाढली आहे़ तसेच मुंबईत तयार झालेल्या पम्पिंग स्टेशननेही पुराच्या पाण्यापासून सुटका करण्याचा दावा केला आहे. मात्र कचरा व प्लॅस्टिकने तुंबणाऱ्या नाल्यांमधून गाळ काढण्यासाठी बऱ्याच प्रयत्नांनंतर ठेकेदार मिळाले आहेत. त्यामुळे डेडलाइनपूर्वी कामे न झाल्यास पावसाळ्यात नाले भरून वाहण्याची भीती व्यक्त होत आहे. अशावेळी मोठ्या भरतीचे दिवस मुंबईची दैना उडवू शकतात. महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाने नुकतेच जाहीर केल्याप्रमाणे यंदाच्या पावसाळ्यात ४़ ५० मीटरहून अधिक उंच लाटा उसळणारे १८ दिवस आहेत़ तर या पावसाळ्यातील सर्वांत मोठी भरती २५ जून रोजी दुपारी असून, ४़९७ मीटर उंच लाटा या वेळी समुद्रात उसळणार आहेत. या काळात सखल भागांमध्ये पाणी तुंबण्याचा धोका आहे. (प्रतिनिधी)मोठ्या भरतीचा धोकामुंबईतील पर्जन्य जलवाहिन्यांची क्षमता ताशी ५० मिलीमीटर पावसाचे पाणी वाहून नेण्याची आहे़ मात्र मोठ्या भरतीच्या दिवशी समुद्रात उसळणाऱ्या उंच लाटा पाणी बाहेर फेकत असतात़ अशावेळी पाऊस पडल्यास मुंबईत पाणी तुंबते़ २००९मध्ये शंभर वर्षांतील सर्वांत मोठी भरती मुंबईने अनुभवली़ त्या वेळेस २३ आणि २४ जुलै रोजी पाच मीटरहून मोठी भरती होती़२५ जून रोजी दुपारी समुद्रात सर्वांत मोठी भरती असणार आहे. या वेळेस समुद्रात ४.९७ मीटर उंच लाटा उसळणार आहेत. तसेच २३ ते २८ जून या सहा दिवसांमध्ये समुद्रात ४.५ मीटरपेक्षा उंच लाटा उसळणार आहेत.जुलै महिन्यात  २२ ते २७ या सहा दिवसांमध्ये समुद्रात मोठी भरती असणार आहे. यामध्ये २४ जुलै रोजी समुद्रात सर्वाधिक ४.८९ मीटर उंच लाटा उसळणार आहेत.आॅगस्ट महिन्यात २१ ते २४ या तीन दिवसांमध्ये समुद्रात मोठी भरती असणार आहे. त्यात २२ आॅगस्ट रोजी सुमद्रात सर्वांत उंच ४.७५ मीटर उंच लाटा उसळणार आहेत.सप्टेंबर महिन्यात  १९ ते २२ या चार दिवसांमध्ये समुद्रात मोठी भरती असणार आहे. तर २२ सप्टेंबर रोजी सर्वाधिक ४.५४ मीटर उंच लाटा उसळणार आहेत.