शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस, न्यायाधीशांमुळे १८ दिवस कोठडी

By admin | Updated: January 22, 2016 03:40 IST

लग्न करण्याचे वचन देऊन बलात्कार केल्याबद्दल औरंगाबाद येथील एका मुलीने दाखल केलेल्या फिर्यादीत पुण्याच्या भोसरी पोलीस ठाण्याचे अधिकारी व तेथील न्याय दंडाधिकारी

मुंबई : लग्न करण्याचे वचन देऊन बलात्कार केल्याबद्दल औरंगाबाद येथील एका मुलीने दाखल केलेल्या फिर्यादीत पुण्याच्या भोसरी पोलीस ठाण्याचे अधिकारी व तेथील न्याय दंडाधिकारी आणि सत्र न्यायाधीशांच्या हलगर्जीपणाने व चुकांमुळे आरोपीच्या विवाहित बहिणीस व मेव्हण्यास १८ दिवस नाहक कोठडीत राहावे लागल्याबद्दल राज्य सरकारने या बाधित दाम्पत्यास ५० हजार रुपयांची भरपाई द्यावी, असा आदेश उच्च न्यायालयाने गुरुवारी दिला.पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी या प्रकरणी कसूर करणाऱ्या भोसरी ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी आणि भरपाईपोटी द्यावी लागलेली रक्कम त्यांच्याकडून वसूल करावी, असाही आदेश न्या. रणजीत मोरे व न्या. अनुजा प्रभूदेसाई यांच्या खंडपीठाने दिला.एवढेच नव्हे, तर ज्यांनी कायद्याची बूज न राखल्याने या दाम्पत्यास बेकायदेशीरपणे कोठडीत राहावे लागले त्या दंडाधिकारी व सत्र न्यायाधीशांविरुद्ध चौकशी करण्याचाही आदेशही दिला गेला. पोलीस आयुक्तांनी केलेल्या चौकशी व कारवाईचा अहवाल चार महिन्यांत उच्च न्यायालयास सादर करायचा आहे.पुण्यात हिंजेवाडी येथे राहणारा भारत साळवी, त्याची आई आणि इतर नातेवाइकांनी त्यांच्याविरुद्ध भोसरी पोलिसांनी नोंदविलेला गुन्हा रद्द करण्यासाठी याचिका केली होती. ती अंशत: मंजूर करताना खंडपीठाने हा निकाल दिला. त्यानुसार व्यवसायाने डॉक्टर असलेली भारतची विवाहित बहीण मेरी व तिचे डॉक्टर पती अजय यांना सरकारने भरपाई द्यायची आहे. खंडपीठाने भारतविरुद्धचा बलात्काराचा गुन्हा कायम ठेवला. मात्र इतर नातेवाइकांवर नोंदलेले सर्व गुन्हे रद्द केले.या सुनावणीत अर्जदार साळवी व त्याच्या नातेवाइकांसाठी अ‍ॅड. क्षितिजा सारंगी, सरकारतर्फे प्रॉसिक्युटर संदीप शिंदे तर तक्रारदार महिलेसाठी अ‍ॅड. सत्यव्रत जोशी यांनी काम पाहिले. (विशेष प्रतिनिधी)न्यायनगर, गारखेडा, औरंगाबाद येथे राहणाऱ्या ल्युसिया पेतारस जाधव या तरुणीचा सरिता संगम अपार्टमेंट््स, कासारवाडी, पुणे येथील भारत वेवधन साळवी याच्याशी विवाह ठरला होता. दोन्हीकडच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत ल्युसिया व अजय यांचा १२ डिसेंबर २०१४ रोजी साखरपुडाही झाला होता. दोघेही परस्परांचे दूरचे नातेवाईकही आहेत. साखरपुड्याच्या आधी चार दिवस ९ डिसेंबर रोजी भावी सासरच्या घरी गेले असता उशीर झाल्याची सबब सांगून आपल्याला तेथेच राहायला सांगितले गेले.