शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

मांगी-तुंगी तीर्थक्षेत्रासाठी १८ कोटींचा निधी

By admin | Updated: December 24, 2015 02:36 IST

बागलाण तालुक्यातील दिगंबर जैनधर्मीयांच्या श्रीक्षेत्र मांगी-तुंगी तीर्थक्षेत्री फेब्रुवारीत होणाऱ्या भगवान वृषभदेव मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा व महामस्तकाभिषेक

नाशिक : बागलाण तालुक्यातील दिगंबर जैनधर्मीयांच्या श्रीक्षेत्र मांगी-तुंगी तीर्थक्षेत्री फेब्रुवारीत होणाऱ्या भगवान वृषभदेव मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा व महामस्तकाभिषेक सोहळ््यानिमित्त प्राधान्याने करण्यात येणाऱ्या विविध विकासकामांसाठी राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने १८ कोटी ५८ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यास प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यामुळे कामांना गती येणार आहे. श्रीक्षेत्र मांगी-तुंगी येथे भगवान वृषभदेव यांची १०८ फुटी मूर्ती अखंड पाषाणात घडविण्यात आली असून, मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. विकासकामांना निधी उपलब्ध करून देण्यासाठी ७ नोव्हेंबरला मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. त्यात मुख्यमंत्र्यांनी कामांचा आराखडा सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी प्राधान्याने करण्यात येणाऱ्या कामांसाठी ४० कोटी रुपये खर्चाचा आराखडा सादर केला होता. उपरोक्त आराखड्यापैकी ग्रामविकास विभागाने १८ कोटी ५८ लाख रुपये उपलब्ध करून देण्यास प्रशासकीय मान्यता दिली आहे.मांगी-तुंगी पायथ्याजवळ व भिलवाड गावाजवळ शेतकऱ्यांच्या जागेवर संबंधित निधीतून तात्पुरत्या स्वरूपात शेड उभारण्यात येणार असून त्यात पाणी, स्वच्छतागृह, वीज व अंतर्गत रस्ते आदी सुविधा पुरविल्या जाणार आहेत. तात्पुरते शौचालय उभारणे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, रस्त्यांचे रुंदीकरण, भिलवाडपासून मांगी-तुंगी पायथ्यापर्यंत मातीकाम करणे, पोलीस चौक्या उभारणे, वैद्यकीय सुविधा, आपत्कालीन व्यवस्थापन, पोलीस निवास व्यवस्था, स्वच्छता कर्मचारी पुरवणे, वाहनतळ, सीसीटीव्ही यंत्रणा आदी कामांचा त्यात समावेश आहे. (प्रतिनिधी)