शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

सीईटीपीतील सक्षम यंत्रणेसाठी १८ कोटी

By admin | Updated: June 13, 2016 04:34 IST

लोटे एमआयडीसी येथील कंपन्याचे सांडपाणी वाहत जाऊन ते खाडी आणि नद्यांच्या पाण्यात मिसळत असल्याने तेथील पाणी प्रदूषित होत आहे.

श्रीकांत चाळके,

खेड- खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसी येथील कंपन्याचे सांडपाणी वाहत जाऊन ते खाडी आणि नद्यांच्या पाण्यात मिसळत असल्याने तेथील पाणी प्रदूषित होत आहे. अशा पाणीप्रदूषित परिसरातील गावांमध्ये काही लोकांना कॅन्सर झाला असल्याचे पुढे येत आहे. गेली अनेक वर्ष हा प्रश्न अधांतरी राहिला असून, याबाबत आपण सीईटीपी तसेच टाटा कॅन्सर रिसर्च आणि डेरवण रूग्णालयाच्या कॅन्सर विभागप्रमुखांशी चर्चा करून संबंधितांची तपासणी करण्यासाठी सहकार्य करू, असे भाजपचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी सांगितले. लोटे येथील सीईटीपीची सध्याची क्षमता कमी असल्याने ती वाढवून सक्षम यंत्रणा करण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलणे झाले आहे. त्याकरिता १८ कोटी रूपये खर्चाला अनुमती मिळणार असल्याची माहिती माने यांनी दिली आहे.खेड येथील अनिकेत शॉपींग सेंटरमध्ये आयोेजित पत्रकार परिषदेत बाळ माने बोलत होते. खेड नगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्यावतीने खेड शहरासाठी करण्यात येत असलेल्या विकासकामांबाबत बाळ माने यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी खेडचे माजी नगराध्यक्ष आणि खेड भाजपचे पदाधिकारी आबा जोशी, अ‍ॅड. मिलिंद जाडकर, खेडचे माजी तालुकाध्यक्ष संजय बुटाला, रमेश भागवत, तालुकाध्यक्ष नाना चाळके, अ‍ॅड. संदेश चिकणे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. खेड शहरासाठी नगरोत्थान योजनेंतर्गत १३ कोटी रूपये खर्चाची सुजल पाणीपुरवठा योजना आणि शहरातील अंतर्गत रस्त्यांचे काँक्रीटीकरण ही दोन कामे भाजपच्या अजेंड्यावर असून, यासाठी खेडचे माजी नगराध्यक्ष आबा जोशी यांचे नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दाखविल्याची माहिती दिली. >कॅन्सरची लागण : मुख्यमंत्र्यांशी बोलणारगेली अनेक वर्ष हा प्रश्न अधांतरीत राहिला आहे.सीईटीपी, टाटा कॅन्सर रिसर्च, डेरवण रूग्णालयाच्या विभागप्रमुखांशी चर्चा करणार.लोटे एमआयडीसीतील प्रदूषित पाण्यामुळे खाडीपट्ट्यातील नागरिकांना कॅन्सरची लागण होत असून, त्याकडे हेतूपूरस्सर दुर्लक्ष होत असल्याचे सांगताच ही बाब गंभीर असल्याचे बाळ माने म्हणाले. याबाबत मुख्यमंत्री तसेच अन्य संबंधितांशी बोलून करून निर्णय घेऊ तसेच संबंधित रूग्णांची तपासणी करून अशा प्रकारच्या आजाराबाबत खात्री करण्यासाठी यंत्रणेशी बोलू, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.गाळाकडे लक्ष देणारजगबुडी नदीतील गाळ काढणेचे काम गेले३ वर्षे सुरू आहे़ लवकरच याबाबत संबंधितांशी चर्चा करून खरी परिस्थिती समोर आणू, असे त्यांनी सांगितले़