ऑनलाइन लोकमत
येवला, दि. 2 - शेतकरी संपाच्या दुसऱ्या दिवशी येवल्यात 18 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पालखेड मिरचिचे ता.निफाड येथे आज मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, माधव भंडारी आणि रावसाहेब दानवे यांच्या प्रतिकात्मक पुतळयाची अंत्ययात्रा काढन्यात आली. शेतकरी संपाच्या दुस-या दिवशी धुळगाव येथे मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळला.
शेतकरी संघटना नेते संतु पा झांबरे यांच्या नेतृत्वाखाली शेतक-यांचे आदोलन दुस-या दिवशीही कायम सुरू आहे. नांदूर शिंगोटे( सिन्नर) येथे बायपास जवळ नारळ,आंबे,टोमॅटो घेवून जात असतांना तीन मालट्रक शेतकऱ्यांनी पकडले.
येवला कोपरगाव रस्त्यावरील पिंपळगाव-जलाल येथील टोल नाका येथे काल झालेल्या शेतकरी संपात वाहने अडवून नुकसान केल्याप्रकरणी 40 ते 45 जणांना आज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यातील 18 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. इतरांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया येवला पोलीस ठाण्यात सुरू आहे.
शेतकरी संपाच्या दुसऱ्या दिवशी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांनी कोणताही भाजीपाला विक्रीस न आल्याने ओस पडली आहे. नेहेमी लगबग असलेल्या बाजार समिती आवारात काही जण क्रिकेट खेळत आहेत, तर काही मालवाहू वाहने रिकामी उभी आहेत. बाजार समिती आवारात "आता बस्स, शेतकऱ्यांनो चला संपावर" असे फलक लावलेले आहेत.