शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती विभागात १.७८ लाख टन उसाचे गाळप!

By admin | Updated: January 28, 2016 20:57 IST

पश्‍चिम विदर्भात यावर्षी ऊस उत्पादकांना दुष्काळाचा फटका.

ब्रह्मनंद जाधव/मेहकर (बुलडाणा): पश्‍चिम विदर्भात यावर्षी ऊस उत्पादकांना दुष्काळाचा फटका बसला असून, राज्यात झालेल्या ४४३.0४ लाख क्विंटल साखरेच्या उत्पादनापैकी केवळ १.६८ लाख क्विंटल साखर उत्पादन अमरावती विभागात झाले आहे. राज्यात ४१५.९७ लाख टन तर अमरावती विभागात १.७८ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. पश्‍चिम विदर्भात अत्यल्प पर्जन्यमानामुळे जलस्रोत घटले आहेत. या दुष्काळी परिस्थितीचा फटका ऊस उत्पादकांना बसला आहे. यावर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे उस उत्पादन घटले असून, सध्या १७३ साखर कारखाने सुरू आहेत. त्यामध्ये ९६ सहकारी व ७७ खासगी कारखान्यांचा समावेश आहे. राज्यात यंदा ४१५.९६ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. राज्याच्या एकूण ऊस गाळपापैकी सर्वात कमी ऊस गाळप अमरावती विभागात झाले आहे. अमरावती विभागामध्ये केवळ १.७८ लाख टन उसाचे गाळप व १.६८ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. नागपूर विभागात २.९0 लाख टन उसाचे गाळप व २.७४ लाख क्विंटल उत्पादन झाले आहे. विदर्भातील ऊस मराठवाड्यातअमरावती विभागातील जमिनी कोरडवाहू असल्याने येथे उसाचे क्षेत्रही मुळातच कमी आहे. त्यामुळे साखर कारखान्यांचे प्रमाणही बोटावर मोजता येईल एवढे आहे. मराठवाडा, खान्देशपेक्षा कमी भाव असल्याने पश्‍चिम विदर्भातील ऊस मराठवाडा खान्देशमधील साखर कारखान्यांमध्ये जात आहे.साखर उतार्‍यात विदर्भाचा टक्का ९.४६ टक्केराज्यात ४४३.0४ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले असून, सरासरी १0.६५ टक्क्यांच्या उतार्‍याने हे उत्पादन आहे. पुणे विभागात १0.५१ टक्के, अहमदनगर विभाग १0.३४ टक्के व राज्यातील इतर विभागही याचबरोबरीने आहेत; परंतु साखर उतार्‍यात विदर्भाचा टक्का घसरला असून, विदर्भातील अमरावती विभाग व नागपूर विभागात ९.४६ टक्केच साखर उतारा आहे.