शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील १७५ साहाय्यक निरीक्षकांच्या बदल्या!

By admin | Updated: May 24, 2017 03:17 IST

राज्य पोलीस दलात कार्यरत असलेल्या १७५ साहाय्यक निरीक्षकांच्या सर्वसाधारण बदल्या करण्यात आल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्य पोलीस दलात कार्यरत असलेल्या १७५ साहाय्यक निरीक्षकांच्या सर्वसाधारण बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात मुंबई, नवी मुंबई व ठाणे जिल्ह्यातील २५ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. पोलीस मुख्यालयातून सोमवारी रात्री बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले. येत्या काही दिवसांत ४०० हून अधिक उपनिरीक्षकांच्या बदल्या तर सुमारे ७०० एपीआयना पदोन्नती देण्यात येणार असल्याचे सूत्रानी सांगितले.सध्याच्या ठिकाणी मुदत पूर्ण होऊनही बदली न करण्याची विनंती केलेल्या ८८ अधिकाऱ्यांना एक वर्षाची मुदतवाढदेखील दिली आहे.महाराष्ट्र पोलीस कायदा कलम २२ न (१) अन्वये पोलीस आस्थापना मंडळ क्रमांक दोनने राज्यातील विविध पोलीस अधीक्षक, आयुक्तालये आणि अन्य विभागांतील कार्यकाळ पूर्ण झालेल्या १७५ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यात मुंबई आयुक्तालयातील आठ तर नवी मुंबई व ठाणे जिल्ह्यातील १५ हून अधिक अधिकाऱ्यांचा समावेश आहे. बदलीसाठीचा कार्यकाळ पूर्ण होऊनही वैयक्तिक, कौटुंबिक कारणास्तव सध्याच्या ठिकाणी विनंती केलेल्यांपैकी ८८ अधिकाऱ्यांची विनंती मान्य केली आहे. त्यांना कार्यरत असलेल्या ठिकाणी आणखी एक वर्षाची मुदत देण्यात आली आहे. खात्यांतर्गत राज्य लोकसेवा आयोग व सरळसेवेतून भरती झालेल्या अधिकाऱ्यांपैकी साहाय्यक निरीक्षकांच्या सेवा ज्येष्ठता व पदोन्नतीचा प्रश्न गेल्या वर्षभरापासून प्रलंबित होता. त्याबाबत ‘मॅट’ने दिलेल्या निर्देशानुसार येत्या काही दिवसांत ७०० एपीआयना पदोन्नती देण्यात येणार आहे, असे मुख्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.