शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

चोरीच्या १७ दुचाकी जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2016 02:09 IST

दुचाकी चोरीप्रकरणी नेरूळ पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

नवी मुंबई : दुचाकी चोरीप्रकरणी नेरूळ पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. चोरी केलेल्या दुचाकी त्यांनी मुंबई व नवी मुंबई परिसरात विकल्या होत्या. त्यापैकी १७ दुचाकी पोलिसांच्या हाती लागल्या असून, त्यामध्ये १२ अ‍ॅक्टीव्हा स्कूटर आहेत.शहरातील वाढत्या वाहनचोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी कसून तपासाला सुरवात केली आहे. त्याकरिता यापूर्वी घडलेल्या गुन्ह्यांमधील घटनास्थळावरील सीसीटीव्हीत कैद झालेल्या गुन्हेगारांच्या शोधावर देखील पोलिसांनी भर दिला आहे. अशाच एका पुराव्यावर कौशल्यपूर्ण तपासाअंती नेरुळ पोलिसांनी दोघा सराईत दुचाकी चोरांना अटक केली आहे. कामरान ऊर्फ रफिक खान (५३) व इस्माईल शेख (३५) अशी त्यांची नावे आहेत. नेरूळ परिसरातल्या वाहनचोरीच्या घटनांची उकल करण्यावर वरिष्ठ निरीक्षक अधिकराव पोळ यांनी जोर दिला होता. त्यानुसार सहाय्यक निरीक्षक वासुदेव मोरे व सुशीलकुमार गायकवाड यांच्या तपास पथकामार्फत सराईत गुन्हेगारांचा शोध घेतला जात होता. यादरम्यान कामरान हा त्यांच्या हाती लागला होता. त्याला ताब्यात घेवून अधिक चौकशी केली असता त्याने गुन्ह्यांची कबुली दिली. त्यानंतर तपास पथकाने इस्माईल याला गोवंडी येथून अटक केली. कामरान हा उलवेचा तर इस्माईल हा गोवंडीचा राहणारा आहे. या दोघांच्या अधिक चौकशीत त्यांनी चोरलेल्या १७ मोटारसायकली वेगवेगळ्या ठिकाणावरून जप्त केल्याचे परिमंडळ १ चे उपआयुक्त प्रशांत खैरे यांनी सांगितले. त्यामध्ये १२ अ‍ॅक्टीव्हा स्कूटर असून इतर पाच वेगवेगळ्या प्रकारच्या दुचाकी आहेत. या एकूण वाहनांची सुमारे ४ लाख २० हजार किंमत आहे.>बनावट कागदपत्रांचा वापर!चोरलेल्या दुचाकींच्या नंबरप्लेट बदलून त्या नवी मुंबईसह मुंबई परिसरात स्वस्तात विकल्या होत्या. याकरिता त्यांनी बनावट कागदपत्रांचाही वापर केला असण्याची शक्यता आहे.दोघांकडून नेरूळ परिसरातील सात व इतर ठिकाणचे पाच अशा १२ गुन्ह्यांची उकल झालेली आहे. या टोळीकडून इतरही मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वरिष्ठ निरीक्षक अधिकराव पोळ यांनी व्यक्त केली.