शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

उड्डाणपूल उभारणीसाठी १७ कोटी खर्च

By admin | Updated: January 19, 2017 06:03 IST

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि रेल्वेचे वेळापत्रक स्थिर राहावे यासाठी स्थानक हद्दीत असणारे रेल्वे फाटक बंद केले जात आहे.

मुंबई : प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि रेल्वेचे वेळापत्रक स्थिर राहावे यासाठी स्थानक हद्दीत असणारे रेल्वे फाटक बंद केले जात आहे. त्याऐवजी रेल्वे व स्थानिक पालिकांच्या सहकार्याने रोड उड्डाणपूल (आरओबी) उभारले जात आहे. मात्र, शासकीय उदासीनतेमुळे हे पूल अजूनही अर्धवट अवस्थेत असून आतापर्यंत १७ कोटी रुपये पुलांच्या कामावर खर्च करण्यात आले आहेत. मध्य रेल्वे मार्गावर कळवा-खारेगाव, आंबिवली, ठाकुर्ली, चुनाभट्टी येथे रेल्वे फाटक आहेत. स्थानिक वाहतुकीसाठी फाटक दोन ते तीन मिनिटे सुरू राहिल्यास लोकल फेऱ्यांवर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे फेऱ्यांना लेटमार्क लागण्यासह वेळापत्रक बिघडते. काही वेळेला तर लोकल फेऱ्या रद्दही कराव्या लागतात. महत्त्वाची बाब म्हणजे फाटकांच्या ठिकाणी अनेकदा अपघातांनाही तोंड द्यावे लागते. त्यामुळे फाटक बंद करून उड्डाणपूल बांधण्याचे नियोजन मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे. यात स्थानिक पालिकांचीही मदत घेतली जात असून सुरुवातीला खारेगाव आणि शहाड-आंबिवली येथेही उड्डाणपूल उभारले जात आहे. प्रस्तावानुसार रेल्वेच्या हद्दीतील उड्डाणपुलांचे बांधकाम रेल्वे, तर पालिकेच्या हद्दीतील बांधकामाची जबाबदारी ही पालिकेकडे आहे. शहाड-आंबिवली दरम्यान उड्डाणपुलाचे काम २0१५पासून सुरू करण्यात आले. त्यासाठी आतापर्यंत रेल्वेचे नऊ कोटी रुपये खर्च करण्यात आले असून अजूनही पुलाचे काम पूर्ण झालेले नाही. दोन आठवड्यांपूर्वी खारेगावजवळीलही फाटक बंद करून उड्डाणपूल बांधण्याचे काम सुरू केले असून, या कामासाठीही साडेआठ कोटी रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती रेल्वेतील सूत्रांकडून देण्यात आली. खारेगाव येथे उड्डाणपूल उभारण्याचा एकूण खर्च १७ कोटी रुपये एवढा आहे. या कामात आतापर्यंत रेल्वेकडून गर्डर उभारण्यात आला असून उर्वरित काम हे ठाणे पालिकेकडून केले जाईल; परंतु अजूनही काम पुढे सरकलेले नाही. (प्रतिनिधी)महापालिकेकडून पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी कोणतीही तयारी केलेली नाही. त्यामुळे हे काम कधीपर्यंत पूर्ण होईल हे सांगणे कठीण आहे. - रवींद्र गोयल (मध्य रेल्वे-विभागीय रेल्वे व्यवस्थापक)